पॉर्न फिल्म रॅकेट : 'पॉर्न'मधून पूनम पांडे, शर्लिनने खोऱ्याने पैसा ओढला! | पुढारी

पॉर्न फिल्म रॅकेट : 'पॉर्न'मधून पूनम पांडे, शर्लिनने खोऱ्याने पैसा ओढला!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी उद्योगपती राज कुंद्रा, अभिनेत्री गहना वशिष्ठ यांच्यासह एकूण ११ जण अटकेत आहेत. पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात रोज एकामागून एक खुलासे समोर येत आहे. या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठ सर्वांधिक चर्चेत आहे. याआधी दोन महिलांनी गहना आणि रोवा खानवर गंभीर आरोप केले होते.

दोन पीडित महिलांनी पोलिसांत आपला जबाब नोंदवताना गहना आणि रोवा खानवर धमकी देणे आणि जबरदस्तीने अश्लिल व्हिडिओ शूट केल्याचा आरोप केला होता.

एवढेच नाही तर एका पीडितेने पॉर्न व्हिडिओ शूट करण्यास नकार दिल्यानंतर काही लोकांनी तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. आणि पोलिसांत तक्रार करु नकोस अशी धमकीही दिल्याचा आरोप पीडितीने केला आहे. या दरम्यान गहनाने आपली बाजू मांडली आहे.

गहना वशिष्ठ
गहना वशिष्ठ

गहनाने पुन्हा एकदा पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. पूनम पांडे आणि शर्लिनने सॉफ्ट पॉर्नच्या माध्यमातून खूप पैसा कमावला आहे. तरीही पोलिस माझ्यावर का कारवाई करत आहेत, असा दावा गहनाने केला आहे.

जे लोक या धंद्यातून गेल्या १८ ते २० महिन्यांपासून खूप पैसा कमवत आहेत. ज्यांची कमाई माझ्यापेक्षा सुमारे ३० टक्के ज्यादा आहे. त्यांना काही विचारले जात नाही. मात्र, माझ्यावर कारवाई केली जात आहे.

मुंबई पोलिस मलाच का टार्गेट करत आहे. अनेकांनी यातून पैसा कमवला आहे. काही मॉडेल्स आणि पॉर्न स्टार्संनी ४० ते ५० लाखांहून अधिक पैसा कमवला आहे. त्यामुळे त्या निश्चितच पीडित नाहीत. त्या आता मुंबई सोडून दुसऱ्या जागी शिफ्ट झाल्या आहेत, असे गहनाने म्हटले आहे.

गहना वशिष्ठ
गहना वशिष्ठ

पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिच्याकडे गेल्या शुक्रवारी तब्बल आठ तास कसून चौकशी केली होती. या प्रकरणाच्या चौकशीत गुन्हे शाखेच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागली असून शर्लिन चोप्रा हिला पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.

‘राज कुंद्राने माझे फूल न्यूड व्हिडिओज केले’

दरम्यान पोलिसांकडे आपला जबाब नोंदवल्यानंतर शर्लिनने एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. त्यात तिने राज कुंद्राने म्हटले होते की शिल्पा शेट्टीला तिचे व्हिडिओज खूप आवडायचे.

मी राज कुंद्राच्या आर्म्सप्राइम मीडिया सोबत एक करार केला आणि व्हिडिओज बनवणे सुरु केले. त्यानंतर हळूहळू बोल्ड चित्रपटांविषयी माहिती होत गेले. त्यानंतर मला सेमी न्यूड आणि फूल न्यूड व्हिडिओज करायला लावले. मला नेहमीच सांगितले जात होते की यात चुकीचे काहीच नाही. हे सगळेच करतात.

काय खरे आणि काय खोटे?

राज कुंद्रा मला सांगायचा की शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओज आणि फोटोज आवडतात. यामुळे मला आणखी व्हिडिओज करण्यासाठी प्रोत्साहन मिळायचे.

जेव्हा तुम्ही शिल्पा शेट्टी सारख्या व्यक्तीकडून प्रोत्साहन मिळते त्यावेळी तुम्हाला कळत नाही की काय खरे आणि काय खोटे? असेही शर्लिनने एका मुलाखतीत म्हटले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोकणी खेकडा फ्राय रेसिपी माहीत आहे का?

Back to top button