Money Heist 5 : प्रोफेसरचा होणार का मृत्यू? | पुढारी

Money Heist 5 : प्रोफेसरचा होणार का मृत्यू?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी हाएस्ट – ५ चा पाचव्या सीझनची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, या सीरीजची सुरुवात प्रोफेसरच्य़ा मृत्यूने सुरू होईल. मनी हाएस्टच्या ४ थ्या सीरिजमध्ये शेवटच्या भागात इन्स्पेक्टर अॅलिसियाने प्रोफेसरवर रिव्हॉल्वर रोखलेली असते. येथेच चौथा भाग संपला होता. पण, अॅलेसियाने प्रोफेसवर (स्पॅनिश अभिनेता अल्वारो मोर्टे) गोळी झाडली का? त्यात प्रोफेसरचा मृत्यू झाला का? हे पाहणे, प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरेल. 

वाचा – उत्सुकता संपली! मनी हाएस्ट 5 : नेटफ्लिक्सने थरारक टीझरसोबत रिलीज डेटची केली घोषणा  (Video)

नेटफ्लिक्सवरील मनी हाएस्ट ही थ्रिलर सीरिज प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात दोन व्हॉल्युममध्ये या सेरिजीचा शेवट होत आहेत. काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सने मनी हाएस्टचा टिझर रिलीज करत सीरीजच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली होती. टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांना पुढे काय होणार? याची उत्सकुता लागून राहिली आहे. 

ही सीरिज स्पॅनिश क्राईम ड्रामा ला कासा डे पॅपेल (द हाउस ऑफ पेपर) नावानेदेखील लोकप्रिय आहे. नेटफ्लिक्स मनी हाएस्ट सीझन- ५ चे दोन भागात स्ट्रीमिंग करण्यात येईल. पहिला भाग ३ सप्टेंबरला भेटीला येईल आणि दुसर्‍या भागाचा ३ डिसेंबरला प्रीमियर होईल. मनी हाएस्ट सीझन-५ मध्ये अल्वारो मोर्टे, उर्सुला कोरबेरो, पेड्रो अलोन्सो, इट्जियार इटुनो, नजवा निमरी, जॅम लोरेंटे, मिगुएल हेरान, एस्तेर एसेबो, रोड्रिगो डे ला सेर्ना, डार्को पेरिक आणि होविक केचकेरियन या कलाकारांचा समावेश आहे. 

या सेरिजमध्ये प्रोफेसर (अल्वारो मोर्टे) मारला जाणार का? याबद्दल फॅन थेअरी सोशल मीडियात पसरू लागल्या आहेत. मनी हाएस्टचे चारीही सीझनमधील सर्वच पात्रांनी आपली छाप सोडलेली आहे. मनी हाएस्टच्या दुसर्‍या सीझनपासून या सीरीजला अधिक लोकप्रियता मिळाली. लुटारू टोळीचा म्होरक्या असलेला प्रोफेसर अर्थातचं स्पॅनिश अभिनेता अल्वारो मोर्टे उच्च शिक्षित, अत्यंत थंड डोक्याचा, अगदी सामन्य वेशभूषा असलेला आणि वेळप्रसंगी रडणार्‍या अभिनेत्याची भूमिका ही वेबसेरिजच्या विश्वातील सर्वोत्तम भूमिका ठरली आहे, असे म्हटले तरी चुकीचं ठरणार नाही. 

प्रोफेसरच्या मृत्यूबद्दलच्या फॅन्स तर्क-वितर्क लढवत आहेत. एका फॅन थेअरीनुसार अलेसियाने ४थ्या सीरिजच्या शेवटच्या भागात प्रोफेसवर गोळी झाडलेली आहे, पण, ते या भागात दाखवण्यात आलेलं नाही. तर काही फॅन थेअरीनुसार पाचव्या भागातील पहिल्या दहा मिनिटांतच प्रोफेसरचा मृत्यू झालेला दाखवण्यात आलेला असेल. या सीरिजला दुःखद वळण देण्यासाठी प्रोफेसरचा मृत्यू दाखवण्याशिवाय पर्याय नाही, असं एका फॅनने म्हटलं आहे.

 

Back to top button