सलमान खानच्या घरात आता सोहेलचा संसार मोडला; तब्बल २४ वर्षांच्या संसारावर 'पाणी' ! | पुढारी

सलमान खानच्या घरात आता सोहेलचा संसार मोडला; तब्बल २४ वर्षांच्या संसारावर 'पाणी' !

पुढारी; ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड दुनियेत नाती तयार करणं आणि ती काही क्षणात तोडणं ही काही मोठी गोष्ट नाही. इथे छोट्या छोट्या गोष्टींवरून नाती तुटतात आणि जोडलीही जातात. बॉलीवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खानही घटस्फोट घेत असल्याची बातमी समोर आली आहे. सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान फॅमेली कोर्टाबाहेर दिसले. यावरून ते लग्नाच्या २४ वर्षांनंतर घटस्फोट घेत असल्याचे समजते.

सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांचा सुखी संसार २४ वर्षानंतर तुटत असल्याने त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. दोघांच्या या घटस्फोटाच्या बातमीने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवली आहे. सोहेल आणि सीमा यांच्या लग्नाला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत.  त्यांचे नाते  तुटत असल्याचे समजल्यावर या घटनेवर चाहत्यांना विश्वास बसेनासा झाला आहे.

अभिनेता सोहेल खान सीमा सचदेव यांची अशी आहे ” लव्ह स्टोरी “

अभिनेता सोहेल खानने सीमा सचदेवशी १९९८ मध्ये लग्न केले होते. सीमा व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. पंजाबी हिंदू कुटुंबातील, सीमा आणि सोहेल पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, दोघांचे हे नाते त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. सीमाचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते. सोहेल खान दिग्दर्शित ‘जब प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट २७ मार्च रोजी प्रदर्शित झाला. त्याच दिवशी सोहेलने सीमासोबत घरातून पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केले होते.

हेही वाचलत का ?

Back to top button