

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीमधील लोकप्रिय जोडी आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांच्यात बिनसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये दुरावा निर्माण होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांच्यामध्ये मतभेदाची दरी रुंदावत असली, तरी याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.
उर्मिलाने अलीकडेच टीव्ही पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तुझेच मी गीत गात आहे च्या माध्यमातून ती पडद्यावर पुन्हा दिसत आहे. तिने पुनरागमन करण्यासाठी स्वत:च्या पतीच्या प्रॉडक्शन हाऊसचा मार्ग सोडून दुसरा निवडल्याने त्यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये आणखी चर्चेला भर मिळण्याचे कारण म्हणजे आदिनाथने उर्मिलाला वाढदिनी शुभेच्छा दिल्या नव्हत्या. त्यामुळे चाहतेही बरेच नाराज झाल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यांच्यामध्ये सध्या काय घडत आहे याबाबत कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
महेश कोठारे दिग्दर्शित शुभ मंगल सावधानच्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिलाची प्रेमकहाणी सुरु झाली होती. डिसेंबर २०११ मध्ये ते विवाहबद्ध झाले. जानेवारी २०१७ मध्ये त्यांना कन्यारत्न झाले.
आदिनाथ कोठारेनं चंद्रमुखीनंतर त्याच्या आगामी पाणी चित्रपटावर लक्ष केंद्रित केलं आहे. या चित्रपटाचे त्याने स्वत: दिग्दर्शन केलं आहे. उर्मिला मराठी सिरिअल 'तुझेच मी गीत गात आहे' मध्ये दिसून येत आहे.