Mirzapur 3 Date : ‘मिर्झापूर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘गुड्डू भैया’चा नवा लूक व्हायरल!

Mirzapur 3 Date : ‘मिर्झापूर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘गुड्डू भैया’चा नवा लूक व्हायरल!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओटीटीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, निर्माते प्रेक्षकांसाठी सतत नवीन व्हिडिओ कंटेन्ट आणत आहेत. गेल्या काही काळापासून देशात भारतीय वेब सीरिजला मिळालेल्या प्रतिसादानंतर निर्माते अनेक मालिकांच्या सिक्वेलवर जोरदार काम करत आहेत. याच क्रमाने आता निर्माते मिर्झापूर या प्रसिद्ध वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या तयारीत व्यस्त आहेत. मालिकेच्या शेवटच्या दोन सीझनला मिळालेल्या अफाट प्रतिसादानंतर, निर्मात्यांनी काही महिन्यातच मिर्झापूरचा सीझन ३ जाहीर केला. या सीरिजमध्ये गुड्डू पंडितच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता अली फजलने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Mirzapur 3 date)

'मिर्झापूर सीझन 3'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दुस-या सीझनच्या एन्डनंतर या कथेला काय वळण मिळणार हे आता सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. तसेच, गुड्डू भैया (अली फजल) जिवंत असेल की नाही असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. या सगळ्या प्रश्नांच्या पार्श्‍वभूमीवर 'मिर्झापूर'च्या गुड्डू भैय्याने तिसऱ्या सीझनसाठी आपला लूक समोर आणला आहे. (Mirzapur 3 date)

मिर्झापूरचा गुड्डू पंडित उर्फ ​​अभिनेता अली फजल याने मिर्झापूर ३ ची क्रेझ आणखीनच वाढवली आहे. त्याने आपल्या गुड्डू पंडित या व्यक्तिरेखेचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये अली फजल हातात बंदूक घेऊन दिसत आहे. त्यांच्या मागे लोखंडी डबे आणि विचित्र वस्तू ठेवल्याचे दिसत आहे. इंटेन्स एक्सप्रेसशन देत अली कॅमेराकडे पाहतो आहे. (Mirzapur 3 date)

अली फजलने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, आता गुड्डू पंडित पुनरागमन करत आहेत. यावेळी गुड्डू स्वबळावर परतणार आहे. तुम्हाला आठवत असेल की, गुड्डू सीझन २ मध्ये जखमी झाला होता आणि त्याने गोलूची (श्वेता त्रिपाठी शर्मा) मदत घेतली होती. अली फजलने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'आणि वेळ सुरू झाली आहे. तयारी, तालीम, वाचन… लाठी नव्हे, आता खालून शूज आणि वरून फायरींग होणार… लागाओ हात कामाव कंटाप. गुड्डू येतोय… स्वतःहून.'

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news