Sonalee Kulkarni : सोनाली दुसऱ्या हनिमून हॉलिडेसाठी मेक्सिकोत (photos) | पुढारी

Sonalee Kulkarni : सोनाली दुसऱ्या हनिमून हॉलिडेसाठी मेक्सिकोत (photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni ) नुकतीच कुणाल बेनोडेकर पुन्हा मराठमोळ्या पद्धतीने लगीनगाठ बांधली. याबबात तिने एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही गुडन्यूज दिली. तर सध्या ती कुणालसोबत मेक्सिकोत हनिमून आणि सुट्ट्यांचा आनंद घेण्यास पोहोचली आहे. मोक्सिकोतील काही फोटो तिचे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni ) नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर मोक्सिकोतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सोनाली डिप नेक ब्लॅक ब्रा आणि प्लोअरल मिनी स्कर्टमध्ये ग्लॅमरस दिसतेय. यासिवाय तिने आपल्या डोळ्यावर चष्मा आणि सुंदर हॅट परिधान करत चार चॉंद लावले आहेत. दिवसेंदिवस सोनालीचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने Hola de mexico 👒 असे लिहिले आहे. यासोबत तिने #honeymoondiaries #cancun #mexico #sonaleekulkarni #kenosona #3rdhoneymoon असे हॅसटॅगदेखील दिले आहे. यातील खास म्हणजे, शेअर केलेल्या फोटोत सोनाली पांढऱ्या रंगाच्या झोपाळ्यावर हटके अंदाजात बसलेली दिसतेय. सोनालीच्या पाठिमागे नारळाची झाडे आणि रेस्टॉरंट दिसत आहे. यावरून सध्या सोनाली मेक्सिकोत असून सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेत असल्याचे समजते. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘Graceful ❤️’, ‘Beby 🔥’, ‘Beautiful 🔥🔥🔥’, ‘Looking so stunning 😍’, ‘Stunner🔥🔥🔥 Enjoy babe❤️🥂’, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘कोकणात असल्यासारखे वाटतेय’, ‘तू तुझ्या सौंदर्याने घायाळ केलंय’, ‘मार ही डालोगी तुम🔥❤️❤️’, ‘जलपरी❤️❤️’, असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी सोनालीच्या फोटोला प्रतिक्रिया देताना हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहे.

याआधी सोनालीने (Sonalee Kulkarni ) कुणालसोबत पहिले लग्न घाईगडबडीने कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर दोघांनी मराठमोळ्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबबतची माहिती सोनालीने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘#pandemic मुळे दोन वेळा postpone करून तिसऱ्यांदा cancel करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता register marriage करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई- वडील, कुटुंबियांना येता आलं नाही. Zoom call वरून ते साक्षीदार बनले. पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि celebrate करू अशा आशेवर, गेल्या वर्षी ७.०५.२०२१ ला आम्ही court marriage केलं होतं.

यंदा, आमच्या पहिल्या wedding anniversary ला आम्ही सहकुटुंब – सहपरिवार – ठरल्याप्रमाणे – संपूर्ण विधीपूर्वक – मराठमोळ्या पद्धतीने – अगदी स्वप्नवत – लग्न केलं 🙏🏻. काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं – सगळं share करू “लवकरच” !. तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या 🙏🏻असे लिहिले आहे.

याशिवाय सोनाली नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले अपडेटस चाहत्यांसोबत शेअर करत असते. याआधी तिने प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील चंद्रा गाण्यावर ठेका धरला होता. तिच्या डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तर सोनालीने दहावारी साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button