कातळवाडीच्या देसी गर्ल्स व्हायरल | पुढारी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: घराघरात पोहोचलेली झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या एका निर्णायक वळणार येऊन ठेपली. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेतील डिंपलचेसुद्धा बरेच चाहते आहेत. तर नव्याने एन्ट्री घेतलेल्या महिला वकील आर्यानेसुद्धा चाहत्यांवर राज्य करायला सुरूवात केली आहे. दरम्यान, डिंपल आणि वकील आर्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहे.
मालिकेच्या शुटिंगदरम्यान ऑफस्क्रीन कलाकरांची धमाल सुरू असते. याचीच प्रचिती देवमाणूस मालिकेच्या सेटवर पाहायला मिळाली. अनेकवेळा ACP दिव्या, डिंपल, आर्या किंवा संपूर्ण टीमचे व्हि़िओ व्हायरल होताना दिसत असतात. नुकताच डिंपल आणि आर्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघीही ‘देसी गर्ल’ या प्रियांकाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ चाहत्यांना खूपचं पसंत पडत आहे. तसेच या व्हिडिओवर विविध मजेशीर कमेंटसुद्धा येत आहेत.
झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या थरारक मालिकेने चाहत्यांना अगदी खिळवून ठेवलं आहे. मालिकेत दररोज नवनवे ट्वीस्ट येत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली असते. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा ही मजेशीर आहे. टोण्यापासून आजीपर्यंत सर्वच कलाकार अगदी लोकप्रिय झाले आहेत. या सर्व कलाकारांमध्ये खूपचं चांगलं बॉडिंगसुद्धा आहे. हे लोक ऑफस्क्रीन खूपचं धम्माल करत असतात.