

पुढारी ऑनलाईन डेस्क : ४१ वर्षांनी हाॅकीमध्ये भारतीय संघाने कांस्य पदक मिळवलं आणि संपूर्ण देशामधून भारतीय हाॅकी खेळाडुंवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून बाॅलिवु़डच्या अनेक सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी हाॅकी टीमचं अभिनंदन केलं. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तरदेखील (Farhan Akhtar) होता.
फरहानने ट्विट करून आपला आनंद व्यक्त आणि हाॅकी टीमचं अभिनंदन केलं. मात्र, फरहान (Farhan Akhtar) त्यावरून ट्रोल होत आहे. असं कोणतं ट्विट केलं ज्यावरून फरहान ट्रोल होऊ लागला आहे. तर, ट्विट करताना फरहानकडून एक चूक झाली. त्यावरूनच त्याला ट्रोलचा सामना करावा लागत आहे.
ट्विटमध्ये फरहान म्हणाला होता की, "मुलींनो अभिनंदन. मला भारतीय संघावर अभिमान आहे. त्यांना चौथं पदक मिळवलं. चांगली गोष्ट आहे." पुरूष संघाने विजय मिळवला होता. फरहानने महिला संघाचं कौतुक केलं, त्यावरून फराहन ट्रोल होत आहे.
झालेली चूक फरहानने लक्षात येताच सुधारली. पण, तोपर्यंत उशीर झाला. युजर्सनी त्याच्या चुकीच्या ट्विटचा स्क्रिनशाॅट काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. पण, फराहनने ३ मिनिटांच्या आतच हा ट्विट डिलीट केला होता. मात्र, फरहानच्या चुकीवरून हास्यास्पद मिम्स व्हायरल होऊ लागले.
खरंतर हाॅकीच्या भारतीय पुरुष टीमने ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदत मिळविले होते. पुरुष टिमचे अभिनंदन करायचं होतं. पण, चकून भारतीय महिला संघाला फरहान अख्तरने अभिनंदन केले. या चुकीवरूनच फरहान ट्रोल होत आहे.
पहा व्हिडीओ : तेजस्विनी सावंतची पुढारीसाठी विशेष मुलाखत