उर्मिला निंबाळकर हिने दिला गोंडस बाळाला जन्म | पुढारी

उर्मिला निंबाळकर हिने दिला गोंडस बाळाला जन्म

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. याची माहिती उर्मिला निंबाळकर ने स्वत: सोशल मीडियावर दिली आहे.

उर्मिलाने मंगळवारी (दि. 3) रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती तिने आपल्या इंन्स्टाग्रामवरून शेअर केली आहे. याआधीही तिने आपले बेबीबंप आणि डोहाळ जेवणाचे काही फोटो शेअर केले होते.

 ‘माझ्या आयुष्यात ३ ऑगस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीय.’ असे फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्मिलाने लिहिली आहे.

यासोबत तिने #blessedwithbabyboy #Babyboy #newmomlife असे तीन हॅशटॅग वापरले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अनेक कलाकार आणि चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय उर्मिलाने ३ ऑगस्ट रोजीच सकाळीच सात वाजता आणखी एक फोटो शेअर केला होता.

बाळाच्या आगमनाची हिंट

या फोटोसोबत तिने ‘कोणत्याही क्षणी..आनंद, परमानंद, गोविंद’ अशी कॅप्शन लिहिली होती. यानंतर ही तिच्या बाळाच्या आगमनाची हिंट तर नव्हती ना. अशी चर्चा सोशल मीडियात रंगली हाेती.

याआधी उर्मिलाने आपल्या डोहाळ जेवणाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पुण्यातील ‘ढेपे वाडा’ येथे उर्मिलाचं डोहाळे जेवण पार पडले होते. यावेळी तिने हिरव्या रंगाची साडी आणि नाकात नथ असा मराठमोळा लूक केला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button