karishma kapoor : करिश्मा ब्लॅक ड्रेस घालून यॉटवर निवांत क्षणी

karishma kapoor
karishma kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाची चाळीशी पार करूनही काही स्टार्सचे वय दिसून येत नाही. किंबहुना त्यांनी स्वत:ला तसे मेटेंन ठेवलेले असते. यामध्ये एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरही मागे नाही. करिश्माने (karishma kapoor) वयाच्या ४७ व्या वर्षीही स्वत:ला फिट ठेवलं आहे. एक दिवसांपूर्वी, करिश्माने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर आपला एक खूप सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने साजेशी कॅप्शनही लिहिलेली आहे. (karishma kapoor)

करिश्मा सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिने आपल्या फोटोला कॅप्शन दिलीय की, Holidaze ⛱? #takemeback #tuesdaythoughts मंगळवारी तिने हा फोटो काढला आहे.

या फोटोंमध्ये ती एका यॉटवर निवांत बसलेली दिसते. ती ब्लॅक रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसतेय. तिने डोळ्यांवर गॉगल घातला आहे. समुद्रावर ही यॉट हेलकावे खात आहे. यॉट, खळखळणारा समुद्र आणि मस्त हवेचा आनंद घेत करिश्मा बसलेली दिसते.

तिने या फोटोतून फॅशन गोल्स दिले आहेत. ब्लॅक कलरच्या वन शोल्डर ड्रेसमध्ये ती खूप कूल दिसतेय. तिच्या कँडीड पोजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह राहते. चाहत्यांना ती आपले अपडेट्स शेअर करत असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे ७ मिलियन फॉलोअर्स आहेत.

तिने चित्रपट डेंजरस इश्कमधून कमबॅक केलं होतं. या चित्रपटाविषयी खूप चर्चा होती. परंतु, हा चित्रपट चालला नाही. यानंतर तिने बॉम्बे टॉकिज या चित्रपटातील गाण्यात स्पेशल ॲपिरियन्स दिलं होतं. याशिवाय तिने झिरो या चित्रपटातदेखील कॅमियो केला होता.

२०२० मध्ये तिने डिजिटल डेब्यू केला होता. ती मदरहुड चित्रपटातही दिसली होती. वेबसीरीज आल्ट बालाजीवरही हा चित्रपट स्ट्रीम झाला होता. ही वेबसीरीज फॅन्सच्या पसंतीस उतरली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news