नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना एका प्रकरणात जामीन मिळाल्यावर लगेच दुसरा गुन्हा का दाखल करण्यात आला ? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.११) उत्तर प्रदेश सरकारला केली. खान यांच्याविरोधात एकापाठोपाठ ८९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.
उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील तुरुंगात बंद असलेल्या आझम खान यांना शत्रू संपत्तीच्या प्रकरणात जामीन मिळाला, मात्र त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने ते बाहेर येऊ शकलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने यावर लगेच दुसरा गुन्हा दाखल का केला, अशी विचारणा राज्य सरकारला केली. ही धारणा चुकीची असून यावर सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असे उत्तर प्रदेश सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले.
हेही वाचलंत का ?