पुण्यात रस्त्यावर पार्किंगसाठी लागणार जास्त पैसे | पुढारी

पुण्यात रस्त्यावर पार्किंगसाठी लागणार जास्त पैसे

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अँड पार्क’ योजना राबविण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. मात्र, वाहनतळांच्या तुलनेत रस्त्यावरील पार्किंगसाठी तीस टक्के जास्त पैसे मोजावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेे.

sedition law : राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित, सुप्रीम कोर्टाचा आदेश

खासगी वाहनांची वाढती संख्या रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ धोरण राबविण्याचा घाट मार्च 2018 मध्ये महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी व प्रशासनाने घातला होता. याला सत्ताधारी भाजप वगळता सर्व विरोधी पक्ष आणि विविध समाजसेवी संस्थांनी विरोध करत जोरदार आंदोलने केली. या धोरणासाठी पुणेकरांची नाराजी ओढवून घेऊ नये, यासाठी मुख्य सभेत उपसूचना देऊन प्रमुख पाच रस्त्यांवर प्रयोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी ही योजना राबविण्याचा मार्ग अवलंबण्यात आला.

Taj Mahal Controversy : ताजमहाल आमचाच! जयपूर राजघराण्याने सांगितला हक्क

हे पाच रस्ते निवडण्याचा अधिकार महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आला. यानंतर पालिका प्रशासनाने शहरातील जवळपास 38 रस्त्यांचा सर्व्हे करून त्यातील पाच रस्ते निवडण्याचा प्रस्ताव महापौर कार्यालयास दिला. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी अनेक स्मरणपत्रे दिली. मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. आता महापालिकेतील सर्व सूत्रे प्रशासनाच्या हाती आल्यानंतर प्रलंबित पे अँड पार्कचा विषय मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. महापालिका सभागृह अस्तित्वात येण्यापूर्वी पे अँड पार्क लागू करण्यात येणार आहे.

इस्त्रायली सैन्याच्या गोळीबारात अल जझिराच्या महिला पत्रकाराचा मृत्यू

  • पार्किंगची 60 टक्क्यांपेक्षा कमी गरज असलेल्या परिसरात

वाहनतळाचे शुल्क : चारचाकीसाठी 7 रुपये, दुचाकीसाठी 1 रुपया

रस्त्यावरील शुल्क : चारचाकीसाठी 10 रुपये, दुचाकीसाठी 2 रुपये

  • पार्किंगची 60 ते 80 टक्के गरज असलेल्या परिसरात

वाहनतळाचे शुल्क : चारचाकीसाठी 10 रुपये, दुचाकीसाठी 2 रुपये

रस्त्यावरील शुल्क : चारचाकीसाठी 15 रुपये, दुचाकीसाठी 3 रुपये

  • पार्किंगची 80 ते 100 टक्के गरज असलेल्या परिसरात

वाहनतळाचे शुल्क : चारचाकीसाठी 14 रुपये, दुचाकीसाठी 3 रुपये

रस्त्यावरील शुल्क : चारचाकीसाठी 20 रुपये, दुचाकीसाठी 4

Back to top button