HBD Arijit Singh : ‘या’ गायकाला दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता | पुढारी

HBD Arijit Singh : 'या' गायकाला दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडच्या टॉप गायकांमध्ये अरिजीत सिंह (HBD Arijit Singh) एक आहे. त्याने गायलेले प्रत्येक गाणे रसिकांच्या मनावर जादू करते. अरिजीत सिंहच्या आवाजाचा जादू अद्यापही कायम आहे. अरिजीतला बालपणापासून गायकी क्षेत्रात यायचं होतं. त्याने दीर्घकाळ संघर्षदेखील केला आहे. परिणामी, आज तो बॉलिवूडच्या म्युझिक इंडस्ट्रीत राज करत आहे. आज त्याचा ३५ वा वाढदिवस आहे. अरिजीतला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. (HBD Arijit Singh)

अरिजीतच्या वाढदिवसादिवशी फॅन्स सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देत आहेत. अरिजीतने आपल्या करिअरमध्ये कधीच हार मानली नाही आणि नाही संघर्ष सोडला. अरिजीतचे फॅमिली बॅकग्राऊंड संगीत क्षेत्रातील आहे. त्याची आईदेखील गायिका होती. त्याचे मामादेखील तबलावादक होते. अरिजीतची आजीदेखील शास्त्रीय संगीताशी संबंधित होती.

अरिजीतचा आवाज नाकारण्यात आला

अरिजीतच्या करिअरमध्ये सुरुवातीला एकानंतर एक अपयश मिळत गेले. सर्वीत आधी ‘फेम गुरुकुल’ नावाच्या सिंगिग रिॲलिटी शोमध्ये टॉप ५ मध्ये पोहोचण्याआधी शोतून बाहेर झाला होता. तेव्हा अरिजीत केवळ १८ वर्षांचा होता. पण, ही गोष्ट चांगली होती की, याच शोमध्ये संजय लीला भन्साळींनी त्याला नोटिस केलं होतं. त्यांनी रणबीर कपूरचा पहिला चित्रपट ‘सांवरिया’ मध्ये ‘यूं शबनमी’ गाणे गाण्यासाठी संधी दिली होती. पण अरिजीतच्या आवाजातील हे गाणे कधीच रिलीज होऊ शकले नाही.

जेव्हा उघडले रेकॉर्डिंग स्टुडिओ

अरिजीत ’10 के 10 ले गए दिल’ मध्ये विजेता ठरला होता. त्याला मिळालेल्या बक्षिसांच्या १० लाख रुपयांच्या रकमेतून त्याने रेकॉर्डिंग स्टुडिओ उघडला होता. अरिजीचा पहिला अल्बमदेखील ‘सांवरिया’ चित्रपटाचाच होता, परंतु, हा अल्बम रिलीज केला नाही.

‘तुम ही हो’ ने दिली ओळख

अरिजीतने ‘आशिकी २’ चित्रपटातील गाणं ‘तुम ही हो’ गायलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. त्या आवाजातील नशा आणि प्रेम दोन्ही रसिकांनी अनुभवलं होतं. याच वर्षी अरिजीतने ‘फिर मोहब्बत’ आणि ‘राब्ता’ गाणी गायली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

साधी लाईफस्टाईल

अरिजीतला साधी लाईफस्टाईल खूप आवडते. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, ‘मला सेलिब्रिटी होण्यास अजिबात आवडत नाही. मी संगीत क्षेत्रात आलो कारण, माझं संगीतावर प्रेम आहे. त्यामुळे मला फेमस व्हायचं नव्हतं.’

अरिजीत नेहमी पायात साधं चप्पल घालून मुलांच्या शाळेत जातो. तो मुंबईपेक्षी अधिक आपल्या गावी राहतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arijit Singh (@arijitsingh)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arijit Singh (@arijitsingh)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arijit Singh (@arijitsingh)

 

View this post on Instagram

 

A post shared by Arijit Singh (@arijitsingh)

Back to top button