नाशिक : कार्बनडाय ऑक्साईडवर बांबूचा पर्याय भाजप नेते पाशा पटेल यांची माहिती

नाशिक www.pudhari.news
नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करताना पृथ्वीच्या तापमानात 2 अंशाने घट करण्यासाठी 180 देशांचे शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी बांबू लागवड हा एकमेव पर्याय आहे, अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते पाशा पटेल यांनी दिली.

वाढत्या तापमानामुळे 2050 पर्यंत मुंबई, भावनगरसह देशातील 50 शहरे पाण्याखाली खाली बुडतील, असा इशाराही त्यांनी दिला. भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात शनिवारी (दि.23) पत्रकार परिषदेप्रसंगी पटेल यांनी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, कोळसा वीज प्रकल्प, पेट्रोल व डिझेलच्या वारेमाप वापरामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते आहे. एक किलो दगडी कोळश्याच्या वापरातून 2.800 किलो तर एक लिटर पेट्रोल-डिझेलमुळे 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडची निर्मिती होते. हे वाढते प्रमाण पृथ्वीवरील मानवजातीसाठी धोक्याचा इशारा असल्याचे पटेल यांनी सांगितले.

इंधनाला पर्याय म्हणून केंद्र शासन इथेनॉलच्या वापरास सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर लक्ष केंद्रित आहे. पण एक हेक्टर उसापासून केवळ 80 लिटर इथेनॉल निर्मिती होते. त्याचवेळी 1 हेक्टरवरील बांबूपासून 200 लिटर इथेनॉल तयार होते. तसेच बांबूपासून तब्बल 1800 वस्तू तयार होऊ शकतात. त्यामुळे बांबूची उपयोगिता बघता त्याच्या लागवडीसाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना लागू केल्या आहेत. शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घेत बांबूच्या शेतीकडे वळावे, असे आवाहन पटेल यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते. राज्यातील 24 कोळसा वीजप्रकल्पांतून दररोेज 5 लाख 90 हजार किलो कार्बनडाय ऑक्साईडची निर्मिती होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले. पण तूर्तास हे प्रकल्प बंद करता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले.

उत्पन्नातील तफावत चिंताजनक : चीनमध्ये 5 लाख हेक्टरवर बांबूची लागवड करतानाच त्यातून दरवर्षी 3 लाख 20 हजार कोटींची उलाढाल होते. भारतात 10 लाख हेक्टरवर बांबूचे उत्पादन घेताना त्यातून केवळ 18 हजार कोटींचा महसूल मिळत असल्याबाबत पटेल यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news