

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने फॅशन इंडस्ट्रीत एक नवा बेंचमार्क सेट केला. यावेळी तिने जे काही केले ते पाहून तोंडात बोटे घालण्यासारखे आहे. तिने आपल्या शरीरावर कपड्यांऐवजी फुले चिकटविली होती. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत उर्फीने आपल्या स्कीन टोनशी समान न्यूड कलरचा शॉर्टस् घातला आहे.
याव्यतिरिक्त अन्य कोणतेही कपडे नव्हती. उर्फीने या लूकला रंगीबेरंगी फुलांचा साज दिला आहे. उर्फीचा हा बोल्ड लूक पाहून अनेक युजर्सनी पसंती व अनेकांनी नापसंती व्यक्त केली आहे. तर काही युजर्सनी असे न करण्याचा सल्लाही दिला आहे. उर्फी मात्र आपल्या बोल्ड लूकची छायाचित्रे शेअर करत सातत्याने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.