अर्जुन कपूरने घटविले होते 50 किलो वजन | पुढारी

अर्जुन कपूरने घटविले होते 50 किलो वजन

नवी दिल्ली :

अर्जुन कपूर सध्या हिमाचल प्रदेशमध्ये ‘लेडी किलर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याने आपला जुना व नवा असा कोलाज केलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या या फोटोचीच चर्चा होत आहे.

बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी अर्जुन कपूरचे वजन तब्बल 140 किलो होते. त्यावेळी तो 10 सेकंदही धावू शकत नव्हता. मात्र, त्यानंतर त्याने कठोर परिश्रम घेत आपले वजन तब्बल 50 किलोंनी घटविले. खरे तर सलमान खानला पाहून अर्जुन कपूरला वजन कमी करण्याची प्रेरणा मिळाली. अर्जुन कपूरने यासंदर्भात सांगितले की, वजन घटविण्यासाठी सलमान खाननेच मला प्रोत्साहित केले. या अभिनेत्याने माझ्यात अभिनेता बनण्याची क्षमता पाहिली. तू फक्‍त वजन कमी कर, अ‍ॅक्टर बनशील, असे त्याने सांगितले.

Back to top button