Netflix : जुगाड करून लोकांनी लावला चुना, 'आता पासवर्ड शेअर करता येणार नाही' | पुढारी

Netflix : जुगाड करून लोकांनी लावला चुना, 'आता पासवर्ड शेअर करता येणार नाही'

पुढारी ऑनलाईन डेस्क :  तुम्ही जुगाड करून नेटफ्लिक्स पासवर्ड जर शेअरिंग करत असाल तर तुमच्या आनंदावर विरजन पडणार आहे. कारण, आता तुम्हाला हे पासवर्ड शेअर करता येणार नाहीत. अनेक लोकांनी आपले मित्र, नातेवाईक, घरातील सदस्यांना पासवर्ड शेअर केले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या संक्येत मोठ्य़ा प्रमाणात घसरण झाल्यानंतर नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतला आहे.

नेटफ्लिक्सने नेहमी नेटफ्लिक्सच्या युजर्सना विनंती केलीय की, त्यांनी आपल्या अकाऊंटचा पासवर्ड कोणासोबत शेअर करू नये. पण, कुणीही ऐकलं नाही. प्रत्येकाने जुगाड करून कोणत्या ना कोणत्या पध्दतीने नेटफ्लिक्सचा पासवर्ड इतर लोकांना शेअर केले आहेत.

परंतु, दु:खाची गोष्ट अशी की, हा “जुगाड” खूप लवकर संपणार आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने पहिल्यांदा याची पुष्टी केलीय. नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांनी सांगितलंय की, एका दशकात पहिल्यांदा २ लाख ग्राहक गमावले आहेत.  याच कारणामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्‍ये घसरण झाली आहे.

ग्राहकांच्या संख्येत घट झाल्यानंतर नेटफ्लिक्स आपल्या सेवांमध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यावर विचार करत आहे. या बदलांमध्ये पासवर्ड शेअरिंग कमी करण्याचा उद्देश आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये खूप सारे प्रेक्षक ओटीटीवर आले होते. आता लॉकडाऊन संपल्यानंतरही ओटीटीची जादू आहे.

कंपनी ग्राहकांच्या संख्येत झालेल्या घट नंतर पासवर्ड शेअरिंग व्यावसायिकांना जबाबदार ठरवते. नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग बिझनेस क्रॅक करण्यावर काम करत आहे. मागील महिन्यात स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने घोषणा केली की चिली, कोस्टा रिका आणि पेरूमध्ये युजर्सना शेअरिंग करताना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत, असे म्हटले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button