भंडारा : चारित्र्याच्‍या संशयावरुन गरोदर पत्नीचा गळा दाबून खून | पुढारी

भंडारा : चारित्र्याच्‍या संशयावरुन गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

भंडारा : पुढारी वृत्तसेवा 

गरोदर असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा दाबून खून केला. ही घटना मोहाडी तालुक्यातील सितेपार येथे मंगळवारी (दि.१९ ) घडली. याप्रकरणी २२ एप्रिल रोजी आरोपी पतीविरोधात मोहाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अस्मिता ठवकर (२६) असे मृत पत्नीचे नाव असून आकाश दामोधर ठवकर (२९, दोघेही रा. सितेपार ) असे  आरोपी पतीचे नाव आहे. मोहाडी पोलिसांनी आरोपी आकाश ठवकर याला अटक केली आहे.

अस्मिता आणि आकाश यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना ५ वर्षांची मुलगीही आहे. प्रेमविवाह झाल्यापासून आकाश हा अस्मिताशी क्षुल्लक कारणावरून भांडण करून तिला मारहाण करीत होता. आकाशच्या त्रासाला कंटाळून अस्मिताने मागील वर्षी आत्महत्येचा प्रयत्नदेखील केला होता. त्यानंतरही आकाश तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता.

मंगळवारी (दि.१९ ) रोजी सांयकाळी अस्मिता आपल्या घरी मृतावस्थेत आढळून आली. अस्मिताचे वडील प्रकाश झंझाड यांनी तिचा खूनच झाल्याची तक्रार मोहाडी पोलिसात केली.यानंतर आकाशने अस्मिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन ती गरोदर असतानाही तिचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. २२ एप्रिल रोजी मोहाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी आकाश ठवकर याला अटक केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button