जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरण : मुख्य आरोपी अंसारसह अन्‍य आरोपींच्या आर्थिक व्यवहाराचा 'ईडी' करणार तपास | पुढारी

जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरण : मुख्य आरोपी अंसारसह अन्‍य आरोपींच्या आर्थिक व्यवहाराचा 'ईडी' करणार तपास

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरीत घडलेल्या हिंसाचारप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपास सुरू केला आहे. ‘ईडी’ने याप्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपी अंसारविरोधात तपास करण्यासाठी ‘ईडी’ला पत्र पाठल्यानंतर हा तपास सुरू करण्यात आल्याचे कळतेय. जहांगीरपुरी परिसरात १६ एप्रिल रोजी हुनमान जयंतीला दंगल उसळली होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, अंसारसह इतर आरोपींविरोधातही ईडी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वे (पीएमएलए) तपास करणार आहे. दिल्ली पोलिसांकडून अंसार तसेच जहांगीरपुरी हिंसाचारात त्यांच्या भूमिकेसंबंधी कागदपत्रे ईडीकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे पीएमएलए अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंसार तसेच इतरांना कुठल्या संघटनेकडून अथवा व्यक्तिकडून पैसा पुरवण्यात आले का? याचा वापर हिंसाचारासाठी करण्यात आला का? याअनुषंगाने ईडी तपास करणार आहे. शिवाय ईडीच्या अधिकार्‍यांकडून अंसार तसेच इतर आरोपींची बॅंक तसेच मालमत्तेची देखील माहिती गोळा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मोहम्मद अंसारने हिंसाचाराचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button