मुंबई; पुढारी ऑनलाईन : 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही लोकप्रिय मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू आणि ओम यांच्या प्रेमाची नलू परीक्षा घेते आहे.
अनेक अडचणींवर मत करून ओम या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी धडपड करतोय. त्यातच स्वीटू आणि ओममध्ये गैरसमज देखील निर्माण होत आहेत. पण त्यामागे मोहित आणि मालविका यांचा हात आहे.
अधिक वाचा
मालविकाच्या सांगण्यावरून मोहित ओमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करत आहे. पण, काही केल्या ओम हार मानत नाही. हे पाहिल्यानंतर मोहितच्या डोक्यात आता नवीन डाव शिजत आहे.
चिन्याला नोकरी लागल्यामुळे घरी सगळे खूश आहेत, आणि त्याच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी मोहित त्याचा अपघात घडवून आणतो.
अधिक वाचा
या अपघातानंतर स्वीटू आणि ओम तातडीने चिन्याकडे हॉस्पिटलमध्ये जातात. ओमच्या सांगण्यावरून चिन्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार देखील सुरु होतात. पण या दरम्यान मालविकाला कळतं की, हा अपघात घडवून आणण्यामागे मोहितचा हात आहे.
अधिक वाचा
अशावेळी मालविका साळवी कुटुंबाची साथ देईल? की मोहितच्या चुकीवर पडदा टाकेल? मालविकाचा स्टॅन्ड काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्यामुळे 'येऊ कशी तशी मी नांदायला'चा आगामी भाग पाहायला विसरू नका फक्त आपल्या झी मराठीवर.
हेही वाचलंत का?