

मुबंई; पुढारी ऑनलाईन : सिनेमात मुख्य अभिनेत्रीचा रोल देण्याच्या आमिषाने 'कास्टिंग काऊच' चा प्रयत्न करणाऱ्या चार जणांचा मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच हिसका दाखविला आहे. 'कास्टिंग काऊच' चा हा प्रकार करणाऱ्या चौघांना रंगेहात पकडले आहे.
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला असून मनसे पदाधिकारी आणि महिलांनी या परप्रांतीय संशयितांना घोडबंदरमध्ये चांगलाच चोप दिला आहे.
अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन काही व्हिडिओ शेअर करत या प्रकाराचा भांडाफोड केला आहे.
या व्हिडिओमध्ये खोपकर यांनी संपूर्ण प्रकार काय आहे याची माहिती दिली.
एका मराठी अभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना फोनवरून कास्टिंग काऊचची माहिती दिली.
संशयितांना या अभिनेत्रीला सिनेमात मुख्य रोल देण्याचे आमिष दाखविले होते. त्याबदल्यात तिने निर्मात्यासोबत एक रात्र घालवावी असा प्रस्ताव ठेवला होता.
तसेच या निर्मात्याबरोबर तिघेजण असतील असेही तिला सांगितले होते. हा किळसवाना प्रकार तिने मनसे पदाधिकाऱ्याला सांगितला.
संशयितांना तिला फोन करून मुख्य रोल हवा असेल तर काही तडजोड करावी लागेल, तुला त्यांना खूश करावे लागेल.
निर्माता लखनौवरून येणार आहे. त्याला खूश करावे लागेल असे सांगितले.
अभिनेत्रीने आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन हा प्रकार सांगितला. त्यांनी मनसे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना कळवल्यानंतर या लोकांना पकडून पोलिसांच्या हवाली केले.
संबधित तरुणीला घोडबंदर रोड येथील एका फार्म हाऊसवर बोलविण्यात आले होते.
ही मुलगी गेली तेव्हा मनसेचे पदाधिकारीही तेथे पोहोचले. त्यांनी या सर्वांना पकडले. गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव अशी त्यांची नावे आहेत.
मनसेचे पद्मनाभ राणे यांनीही एक व्हिडिओ शेअर केला असूत त्यात म्हटले आहे,
एका मराठी मुलीला तिवारी आणि यादव नावाच्या दिग्दर्शकांनी चित्रपटांमध्ये काम देतो असं सांगून फसवलं.
या दोघांसाठी कास्टिंगचं काम करणाऱ्या दोन व्यक्तींनी या मुलीला तुला निर्मांत्याला खूष करावं लागेल असं सांगितलं होतं.
त्यानंतर या मुलीला फोन करुन ठाण्यातील एका हॉटेलमध्ये यायला सांगितले होते.
तेथे आम्हा दोघांसोबत आणखी एक मित्र असेल असेही सांगितले होते.
आमचा मित्र लखनौहून येणार असून त्याच्यासोबत तुला रात्रभर थांबावे लागेल असे सांगण्यात आले होते.
या अभिनेत्रीने हा प्रकार मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सापळा रचून संबधित तरुणांना पकडले. त्यांना चांगलाच चोप दिला.
पहा व्हिडिओ: बाप्पांच्या आगमनाची लगबग
https://youtu.be/WP-ddRXXXTI