

सिडको; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी सिडको मध्ये पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने तीन जणांना कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडत होती. दरम्यान बुधवारी (दि.२८) रात्री स्टेट बँके जवळ सोनाली मटण भाकरी हॉटेलच्या परिसरात एकास फरशी व खुर्चीने जबर मारहाण करून खून केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेने सिडको परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी माहितीनुसार, सोनाली हॉटेलजवळ बुधवारी रात्री पावने दहाच्या सुमारास ही घटना घडली.
यावेळी तीन ते चार युवकांनी प्रसाद भालेराव या युवकाला किरकोळ कारणावरुन फरशीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.
त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, डॉक्टरांनी रात्री उशिरा प्रसाद भालेराव यास मयत घोषीत केले.
या घटनेनंतर वरिष्ट पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, गुन्हे शाखा सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदेसह घटनास्थळी अंबड पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.
या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पुढील तपास अंबड पोलिस करीत आहे.
हे ही पाहा :