प्रशांत किशोर यांना घेऊया की नको राहुल यांची वरिष्ठ नेत्यांशी मन की बात | पुढारी

प्रशांत किशोर यांना घेऊया की नको राहुल यांची वरिष्ठ नेत्यांशी मन की बात

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यतांनी जोर धरला आहे. प्रशांत किशोर यांना पक्षात समाविष्ट करण्याबाबत राहुल गांधींनी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांकडे मत मागितले आहे.

यापूर्वी राहुल गांधींनी या विषयावर बैठकही घेतली होती, असे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, कमलनाथ आणि अंबिका सोनी उपस्थित होते.

असे सांगितले जात आहे की जर प्रत्येकाने किशोर यांच्या नावाशी सहमत असेल तर त्यांना काँग्रेसमध्ये सरचिटणीस (अभियान व्यवस्थापन) म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली जाऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जुलै रोजी किशोर यांनी गांधी घराण्याला काँग्रेसला पुढे नेण्यासाठी सादरीकरण दिले होते.

२२ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमागील उद्देश म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रशांत किशोर यांच्याबद्दल काय विचार करतात ते जाणून घेणे.

येत्या काही दिवसांत राहुल गांधी यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात असा विश्वास आहे.

प्रशांत यांच्याबद्दल पक्षाला कोणतीही शंका नसल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशांत किशोर यांनी भुतकाळात म्हटले आहे की, काँग्रेसशिवाय भाजपला पराभूत करणे शक्य नाही.

त्याच वेळी एका नेत्याने सांगितले आहे की २२ जुलै रोजी झालेल्या बैठकीत नेत्यांना प्रशांत काँग्रेसमध्ये सामील होण्याबद्दल काय वाटते याबद्दल विचारले गेले. यावर, बहुतेक नेते म्हणाले की ही कल्पना वाईट नाही.

मात्र, JDU मधील त्यांचा राजकीय प्रवास पाहता त्यांच्यासाठी काही मर्यादा निश्चित करण्यावरही चर्चा झाली.

हे ही वाचलं का?

Back to top button