RRR : राम चरण, आलिया ते अजय पर्यंत ‘या’ स्टार्सनी घेतले इतके कोटी | पुढारी

RRR : राम चरण, आलिया ते अजय पर्यंत 'या' स्टार्सनी घेतले इतके कोटी

पुढारी ऑनलाईन डेस्क

एसएस राजामौली दिग्दर्शित, आरआरआर (RRR) २५ मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आरआरआर (RRR) या चित्रपटासाठी कलाकारांनी मोठी रक्कम घेतली आहे. या चित्रपटासाठी कोणी किती पैसे घेतले ते पाहा.

राम चरण

अभिनेता राम चरण मुख्य भूमिकेत आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने भूमिका साकारण्यासाठी तब्बल ४५ कोटी रुपये घेतले आहेत.

ज्युनिअर एनटीआर

सुपरस्टार ज्युनियर एनटीआरनेही चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी अभिनेता ४५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

अजय देवगन

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने त्याच्या भूमिकेसाठी २५ कोटी घेतले आहेत.

आलिया भट्ट

या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टनेही भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने ९ कोटी रुपये घेतले आहेत.

एस. एस. राजामौली

वृत्तानुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना चित्रपटाच्या कमाईतील ३० टक्के वाटा मिळणार आहे.

या चित्रपटाचे ५५० कोटींहून अधिक बजेट आहे. यावरू अंदाज लावता येईल की, आतापर्यंत या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग ६० कोटींहून अधिक झाले आहे. या चित्रपटाला १०० कोटींहून अधिकची ओपनिंग मिळू शकते, असे ट्रेड एक्सपर्टचे म्हणणे आहे. आरआरआरने प्री-रिलीज कमाईमध्येही अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. डिस्ट्रिब्युशन, सॅटेलाईट, म्युझिक यासारखे हक्क विकून चित्रपटाने रिलीजपूर्वीच सुमारे ८०० कोटींची कमाई केली आहे.

आरआरआर बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटींहून अधिक कलेक्शन करेल, असा विश्वास ट्रेड ॲनालिस्टनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी, या चित्रपटाने रिलीजपूर्व अधिकारांमधून ८०० कोटींचा व्यवसाय केला आहे. वृत्तानुसार, दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटाचा प्री-रिलीज थिएटर बिझनेस सर्व भाषांमधून ४७० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, RRR ने USA प्रीमियरमध्ये १६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, आरआरआरच्या ॲडव्हान्स बुकिंगने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला वेग आला आहे. देशाव्यतिरिक्त जगातील इतर भागातही ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

Back to top button