Diabetes : लाईटच्या प्रकाशात झोपल्याने वाढतो डायबेटिसचा धोका | पुढारी

Diabetes : लाईटच्या प्रकाशात झोपल्याने वाढतो डायबेटिसचा धोका

लंडन : झोपण्याचे प्रकार वेगवेळे असू शकतात. कोण अंधारात झोपणे पसंत करतात तर काही लाईटच्या प्रकाशात. यासंदर्भात अमेरिकेत करण्यात आलेल्या संशोधनातील निष्कर्षानुसार लाईटच्या प्रकाशात झोपणे हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
‘नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी’च्या फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या वतीने करण्यात आलेल्या संशोनानुसार झोपेदरम्यान असलेला लाईटचा प्रकाश थोडासा जरी डोळ्यात घुसला तर संबंधिताचे हार्ट रेट आणि ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. यामुळे हृदयासंंबंधीचा आजार अथवा टाईप-2 डायबिटिस होण्याचा धोका बळावतो.

संशोधकांच्या मते, सर्वसामान्यपणे दिवसा हार्टरेट वाढतो आणि रात्रीच्या वेळेस तो कमी होतो. कारण आपला मेंदू हा रात्रीच्या सुमारास शरीराला दुरुस्त करण्याच्या कामात मग्‍न असतो. यामुळेच हार्टरेट कमी असतो. मात्र, संशोधनात सहभागी झालेले लोक ज्यावेळी लाईटच्या प्रकाशात झोपले, त्यावेळी त्यांचा हार्टरेट वाढल्याचे दिसून आले. याशिवाय या लोकांची सकाळी शुगर लेव्हल तपासली असता ती वाढल्याचे दिसून आले. असे जर दीर्घकाळ झाले तर ते टाईप-2 चे कारण बनू शकते. दरम्यान, यासंदर्भात करण्यात आलेल्या आणखी एका संशोधनानुसार रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशात झोपल्यास लठ्ठपणा व वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो, असा दावा करण्यात आला होता.

Back to top button