सांगली पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' माध्यम समूह आणि राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्या विद्यमाने होत असलेल्या 'अॅग्री पंढरी' कृषी प्रदर्शनाची तयारी गतीने सुरू आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्यांना कृषितील नवनवीन तंत्रांचा खजिनाच खुला होत आहे. विशेष म्हणजे, विविध पिके, नावीन्यपूर्ण भाजी पिके यांचे लाईव्ह डेमो हे खास आकर्षण ठरणार आहे.
दि. 15 ते 19 एप्रिलदरम्यान हे प्रदर्शन होत असून विजयनगर येथील मध्यवर्ती शासकीय इमारतींच्या पिछाडीस कृषी विभागाच्या खुल्या जागेत हे प्रदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे, यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या पीक प्रात्यक्षिकांसह सहभागी होणार आहेत. जवळपास दोनशेहून अधिक स्टॉल्स शेतकर्यांना ज्ञानाचा खजिना घेऊन सज्ज होत आहेत.
शेती, दूध उत्पादन, पिके, दुभती जनावरे संगोपन, दूध उत्पादनवाढ आदींची माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे विविध पिकांचे लाईव्ह डेमो होेत आहेत. ऑर्बिट क्रॉप सायन्सेस हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.
मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, रोपांमधील अंतर, खत व्यवस्थापन, पिकांसाठी पाणी व्यवस्थापन, सेेंद्रिय शेती, शेततळे, अत्याधुनिक अवजारे, ट्रॅक्टर, ब्लोअर, पेरणी यंत्र, रोप लावणी यंत्र आदी विविध प्रकारची माहिती या प्रदर्शनातून मिळणार
आहे.
अधिक माहिती व स्टॉल बुकिंग यासाठी, 8805007381, 8805007148 व 9766213003 वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.