पुढारी ऑनलाईन : देवयानी फेम आणि मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे ( Bhagyashree Mote ) तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोमुळे कायमच चर्चेत असते. सध्या तिने आणखी एकदा पिंक रंगाच्या साडीतील काही हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या तिच्या फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.
भाग्यश्री मोटेने ( Bhagyashree Mote ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर पिंक रंगाच्या साडीसोबत ब्लॉऊज परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील खास म्हणजे, तिच्या अंदा आणि नजरेचे चाहते दिवाने झाले आहे. यासोबत तिने साजेशीर दागिन्यासह मेकअप केला आहे. या फोटोच्या कॅप्शमध्ये तिने 'I can't stop myself from looking and noticing you, noticing me✨' लिहिले आहे.
याच दरम्यान आणखी एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने माझ्या लाजाळू पणाच्या मागे एक तेजस्वी, सुंदर आत्मा जळत होता!❤️? असे म्हटले आहे. या फोटोंनी तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. तिचा हा लूक खूपच ग्लॅमरस आणि मनमोहक दिसत आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह मराठी कलाकारांनी कॉमेंन्टसचा पाऊस पडला आहे. यात एका युजर्सने 'ही मेनका ?', 'गुलाबी रंगाच्या सौंदर्यात भाग्यश्री' तर दुसऱ्या एका युजर्सने 'तुझे सौंदर्य आमच्या आत्म्याचा प्रकाश आहे.❤️'असे म्हटले आहे. आणखी एका युजर्सने 'तुझ्या सौंदर्याने घायाळ केलं'. 'मार डालोगी क्या?', 'स्वर्गातली अप्सरा अशिच दिसत असेल! ??????'. असे म्हटले आहे. तर भाग्यश्रीच्या या फोटोंवर मराठी अभिनेत्री रुतुजा बागवेने फायरचा ईमोजी शेअर केला आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.
याआधीही भाग्यश्रीने पांढऱ्या रंगाच्या टिशर्ट आणि निळ्या रंगाच्या पॅन्ट परिधान केलेला फोटो शेअर कोला होता. तर तिचा सोशल मीडियावर ट्रेडिशनल लुक पाहायला मिळाला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'हिरव्या पानांत, हिरव्या पानांत चावंळ चावंळ चालती' असे कॅप्शन दिली आहे. या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. भाग्यश्री नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून अपडेट देत असते.
भाग्यश्री छोट्या पडद्यावरील 'देवयानी' आणि 'पाटील' चित्रपटात दिसली होती. तिने तेलगू 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. भाग्यश्रीचा सोशल मीडियावर ४ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.
हेही वाचलंत का?