नाशिक : शासन विलनीकरणासाठी संपावर गेलेले अनेक कर्मचारी अद्यापपर्यंत कामावर परतलेले नाही. मात्र, उपस्थित कर्मचार्यांसह कंत्राटी कर्मचार्यांच्या मदतीने रस्त्यावर धावणार्या बसगाड्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. बुधवारी (दि.16) नाशिक विभागातून 297 बसेसच्या सुमारे एक हजार फेर्या झाल्या.
राज्याचे परीवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी अल्टीमेटम दिल्यानंतर बरेच कर्मचारी कामावर हजर झाले होते. परीणामी, बसगाड्या व बसफेर्यांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. संप काळात प्रथमच बसेसची संख्या 300 पर्यंत पोहचली होती. नाशिक एक आगारातून 37 खासगी शिवशाहीसोबत एकूण 72 बसेस धावल्या.