HBD श्रेया घोषाल : वयाच्या १६ व्या वर्षी कमावलं नाव, 'या' चित्रपटातील गायले पहिले गाणे | पुढारी

HBD श्रेया घोषाल : वयाच्या १६ व्या वर्षी कमावलं नाव, 'या' चित्रपटातील गायले पहिले गाणे

पुढारी ऑनलाईन डेस्क

गायिका श्रेया घोषाल हे चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे, जिने आपल्या सुरेल आवाजाने लोकांच्या मनावर भूरळ घातली. आज श्रेया घोषाल हिचा आज दि. १२ मार्च रोजी वाढदिवस आहे. श्रेयाचा जन्म १२ मार्च, १९८४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वजित घोषाल आणि आईचे नाव शर्मिष्ठा घोषाल आहे. श्रेयाला सौम्यदीप घोषाल नावाचा भाऊही आहे. तुम्हाला माहिती आहे का, श्रेयाने वयाच्या १६ व्या वर्षी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

श्रेयाने सुरुवातीचे शिक्षण राजस्थानमधून पूर्ण केले. यानंतर श्रेयाचे कुटुंब मुंबईत शिफ्ट झाले. तिने पुढील शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. श्रेयाला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. श्रेयाची आई तिची गुरू आहे. श्रेयाची आई घरात बंगाली गाणी म्हणायची, जी श्रेया ऐकायची. श्रेयाचा संगीताकडे असलेला कल पाहून तिच्या पालकांनी तिला शास्त्रीय संगीत शिकवण्यास पाठवले. वयाच्या १६ व्या वर्षी तिने संगीत क्षेत्रात नाव कमावलं.

श्रेयाने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून संगीताचे धडे घेतले. वयाच्या ६ व्या वर्षी शास्त्रीय संगीत शिकण्यास तिने सुरुवात केली. यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी नाव कमावले. श्रेया पहिल्यांदा सा रे ग मा पा या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये दिसली ज्यामध्ये तिचा आवाज ऐकून सर्वजण दंग झाले आणि ती या शोची विजेती ठरली. गायक सोनू निगम आणि कल्याणजी त्यावेळी त्या शोचे परीक्षक होते. यानंतर श्रेयाला चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळाली.

तिचा आवाज ऐकून संजय लीला भन्साळी यांनी त्यांना त्यांच्या देवदास चित्रपटात गाण्यासाठी पहिला ब्रेक दिला. देवदासमधील गाणे गायल्यानंतर श्रेया बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या गायकांपैकी एक बनली. देवदासमधील गाण्यासाठी, श्रेयाला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पदार्पण पुरस्कार तसेच न्यू म्युझिक टॅलेंटसाठी आरडी बर्मन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रेया आज सर्वोत्कृष्ट गायिका आहे. तिने संगीताच्या दुनियेत एक वेगळी ओळख जपली आहे आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बैरी पिया, सिलसिला ये चाहत का, डोला रे डोला, पियू बोले, घूमर, बरसो रे, दिवानी मस्तानी, हसी बन गए या गाण्यांसह अनेक गाणी गायली आहेत.

Back to top button