रोहित शर्माचा चारशेवा आंतरराष्ट्रीय सामना | पुढारी

रोहित शर्माचा चारशेवा आंतरराष्ट्रीय सामना

पुढारी वृत्तसेवा: भारत-श्रीलंका यांच्यात दुसरी कसोटी लढत शनिवारपासून बंगळूर येथे खेळवण्यात येणार आहे. बंगळूर येथे होणार्‍या डे-नाईट कसोटीमध्ये माजी कर्णधार विराट कोहलीच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाची सर्वांना प्रतीक्षा आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळणार्‍या विराटचे हे घरचे मैदान आहे. पण, हा सामना कर्णधार रोहित शर्मासाठी विशेष महत्त्वाचा आहे.

या सामन्यात मैदानावर पाऊल टाकल्यानंतर हिटमॅन रोहित भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आदी दिग्गजांच्या पंक्तीत स्थान पटकावणार आहे.

रोहित शर्माचा आणखी एक विक्रम

रोहित शर्माचा हा 400 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. सचिन तेंडुलकर (664), महेंद्रसिंग धोनी (538), राहुल द्रविड (509), विराट कोहली (457), मोहम्मद अझरुद्दीन (433), सौरव गांगुली (424), अनिल कुंबळे (403) आणि युवराज सिंग (402) यांच्यानंतर भारताकडून 400+ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो नववा खेळाडू ठरणार आहे.

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

  • सामने 399
  • धावा 15, 672
  • सरासरी 43.65
  • शतके 41
  • अर्धशतके 84

Back to top button