सामंथा रुथ प्रभूनं लग्नातली साडी केली परत? मिटवायचीय नागा चैतन्यची प्रत्येक आठवण! | पुढारी

सामंथा रुथ प्रभूनं लग्नातली साडी केली परत? मिटवायचीय नागा चैतन्यची प्रत्येक आठवण!

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथची प्रसिध्द अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुचे खासगी आयुष्य मध्यंतरी चर्चेत आले होते. अभिनेता नागा चैतन्यशी तिचा झालेला घटस्फोट चाहत्यांना धक्का देणारे होता. कोणालाही विश्वास नव्हता की, साऊथ इंडस्ट्रीतील हे क्यूट कप अशा प्रकारे वेगळे होईल. पण, अखेर सामंथा आणि नागा चैतन्य वेगळे झाले. आता सामंथाला नागाची एकदेखील आठवण मागे ठेवायची नाहीये.

दोघे वेगळे झाल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे जात आहेत. आता ‘पुष्पा’ (Pushpa) फेम अभिनेत्री सामंथाशी संबंधित एक नवी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, म्हटलं जात आहे की, सामंथाने नागा चैतन्यने तिच्या लग्नातील साडी परत दिली आहे.

नागाच्या आजीशी खास कनेक्शन

सामंथाला नागा चैतन्यची कोणतीही आठवण ठेवायची नाही. त्यामुळे रिपोर्ट्सनुसार, तिने आपल्या लग्नातील साडी परत कल्याचे वृत्त समोर आले आहे. सामंथाच्या या साडीचे थेट कनेक्शन नागा चैतन्यच्या आजीशी जोडलं गेलेलं आहे. कारण, ही साडी नागा चैतन्यच्या आजीची होती.

आता सामंथाला नागाच्या परिवाराशी संबंधित कुठलीही वस्तू आपल्याजवळ ठेवायची नाहीये. सामंथाची ही साडी इतकी सुंदर होती की, तुमची त्यावरून नजर हटणार नाही.

ड्रेसवरून झाली ट्रोल

दरम्यान, १० मार्च २०२२ रोजी तिने मुंबईमध्ये ‘क्रिटिक्स च्वॉईस ॲवार्ड्स’ मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमात तिने घातलेल्या आउटफिटवरून ती ट्रोल झाली. या कार्यक्रमासाठी तिने प्लंजिंग नेकलाईन कोर्सेटसोबत ग्रीन-रॅप ड्रेस घातला होता. न्यूड-टोन्ड मेकअप आणि एक वेणीही घातली होती. रेड कार्पेटपर वॉक करताना सुंदर दिसणाऱी सामंथा सोशल मीडियावर मात्र ट्रोल झाली. तिचा हा ड्रेस काही नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही. यानंतर तिला ड्रेसिंग सेंसवरून ट्रोल करण्यात आले.

एक युजरने लिहिलंय, “इतकं कापड मागे लावून ठेवलयं, त्यापेक्षा पुढे लावलं असतं तर. दुसऱ्या युजरने लिहिलं “माझ्या घराचा पडदा मिळाला. काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल जरी केलं असलं तरी तिचा या ड्रेसमधील फोटोशूट अफलातून आहे. तिचे हे फोटोज ट्विटरवर व्हायरल होत आहेत.

Back to top button