Priya Prakash : प्रिया प्रकाशच्या ‘या’ व्हिडिओची भूरळ, नव्या अंदाजात इंडियन ब्युटी | पुढारी

Priya Prakash : प्रिया प्रकाशच्या 'या' व्हिडिओची भूरळ, नव्या अंदाजात इंडियन ब्युटी

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथची अभिनेत्री प्रिया प्रकाशचा (Priya Prakash) सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ती रोज इन्स्टावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना ती आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत​ असते. प्रिया प्रकाश (Priya Prakash) तिच्या एका व्हिडिओने रातोरात प्रसिद्धीच्य़ा झोतात आली. प्रियाचा डोळे मारतानाचा तत्कालीन व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे देशभरात तिचे फॅन फॉलोअर्स वाढले. आता प्रिया प्रकाशने तिचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये प्रियाची वेगळी स्टाईल दिसत आहे.

Priya Prakash
Priya Prakash

प्रिया प्रकाशचा लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ इन्स्टावर व्हायरल होत आहे. ‘जब सैयां आये शाम को तो लग गये चांद मेरे नाम को’ या गाण्यावर त्याने रील शेअर केला आहे. यामध्ये प्रिया इंडियन ब्युटी दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा पारंपरिक पोशाख स्कर्ट आणि ब्लाउज घातला आहे. यासोबतच तिच्या पायात मेहंदीही दिसत आहे. नेकलेस आणि कानातल्यांसोबतच ट्रॅडिशनल लूक देण्यासाठी तिने कपाळांवर बिंदीही लावली आहे.

Priya Prakash
Priya Prakash

चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. एका चाहत्याने लिहिले- क्रश. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, उफ ये अदा. , अनेक चाहत्यांनी कमेंट विभागात हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत.

Priya Prakash

दरम्यान, तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये प्रिया समुद्रात मस्ती करताना दिसत आहे. ती व्हिडिओमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत वॉटरस्पोर्ट्स एन्जॉय करताना दिसतेय. हा व्हिडिओ श्रीलंकेतील आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शन दिलीय की… आम्ही असेच बुडलो. यासोबत तिने स्माईली इमोजीही शेअर केलीय.

Priya Prakash

व्हिडिओच्या पार्श्वभूमीत गहराईया चित्रपटातील डुबे गाणे वाजत आहे. या व्हिडिओसोबत तिने हॅशटॅग लिहिले आहे. ती मैत्रीणींसोबत श्रीलंकेत पर्यटनाला गेलीय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्रिया बोटीत बसते आणि ती बोट काही अंतरावर जाते, तेव्हा तिची मैत्रीण पाण्यात पडते. दुसऱ्या प्रसंगात बनाना बोटीतून जात असताना प्रिया आपल्या मैत्रीणींसह पाण्यात पडते. हा व्हिडिओ पाहण्यासारखा आहे.

Back to top button