आदित्य नारायणच्या बाळाची पहिली झलक व्हायरल (Photo) | पुढारी

आदित्य नारायणच्या बाळाची पहिली झलक व्हायरल (Photo)

पुढारी ऑनलाईन डेस्क

गायक, अँकर आणि अभिनेता आदित्य नारायण त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. आदित्य वडील झाला आहे. त्याला आनंद झाला आहे की, त्याच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले आहे. २४ फेब्रुवारीला ही छोटी परी या कुटुंबाचा एक भाग झाली होती. पण, नारायणने सर्वांना ही आनंदाची बातमी उशीरा दिली. दरम्यान, आदित्य नारायणने अलीकडेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या लहान परीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने आपल्या बाळाला कडेवर घेतल्याचे दिसते.

चाहते त्याच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. आदित्यने बाळाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये बाळाचा चेहरा मात्र दिसत नाहीय. त्याच्या या पोस्टवर कमेंट्सचा ओघ सुरू झाला आहे.

सेलेब्सच्या अशा आल्या कमेंट्स

आदित्य नारायणने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या लहान परीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात तो आपल्या बाळाला खांद्यावर घेतल्याचे दिसून येते. हा फोटो बाळाच्या मागून काढण्यात आला आहे. त्यामुळे मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. या फोटोसोबत त्याने लिहिलंय- ‘मी कृतज्ञ, भाग्यवान आणि धन्य आहे. मी शेवटचे काही आठवडे माझ्या एंजलसोबत घालवणार आहे. लवकरच भेटू डिजिटल वर्ल्ड’.

या पोस्टवर विक्रांत मेस्सी, अली गोनी आणि श्रेया घोषाल यांनी कमेंट केली असून, सिंगरने आदित्यचे मनापासून अभिनंदन केले आहे.
११ वर्षे एकमेकांना डेट केले होते. आदित्य-श्वेताने एकमेकांना ११ वर्षे डेट केलं. त्यानंतर दोघांनी २०२० मध्ये लग्न केलं होतं. दोघांचं लग्न जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत पार पडलं होतं.

Back to top button