divya agarwal breakup : चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री दिव्या अग्रवालचा ‘ब्रेकअप’

divya agarwal breakup : चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री दिव्या अग्रवालचा ‘ब्रेकअप’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बिग बॉस ओटीटी विजेती आणि अभिनेत्री दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद हे दोघेजण गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे ब्रेकअप ( divya agarwal breakup ) झाल्याची माहिती देत दिव्याने चाहत्यांना धक्का  दिला आहे.

नुकतेच दिव्या अग्रवालने इंन्स्टाग्रामवर स्वत: फोटो शेअर केला. या फोटोसोबतच तिने लांबलचक पोस्ट शेअर करत वरुण सूदसोबत ( बॉयफ्रेंड ) ब्रेकअप ( divya agarwal breakup ) झाल्याची माहिती दिली आहे. याचदरम्यान तिने दोघेजण चांगले मित्र असल्याचेदेखील म्हटलं आहे. चाहत्यांनी गेल्या ४ वर्षांचे नाते दिव्याने असे कसे संपवले? असा प्रश्न चाहत्‍यांकडून केला जात आहे.

मला श्वास घ्यायचा आहे, आता स्वत:साठी जगायचं आहे

पोस्टमध्ये दिव्याने लिहिले आहे की, 'आयुष्य हे सर्कससारखे आहे. प्रत्येकाला जीवनात नेहमी आनंदात जगावसे वाटत असते. परंतु, या प्रक्रियेत जर अडचणींचा सामना करताना प्रेम करणारी व्यक्ती कमी पडत असेल तर यात काय करावे, म्हणून मला हे नातं संपवावं लागत आहे. माझ्यासोबत जे काही होत आहे त्यासाठी मी कोणाला दोषी ठरवत नाही. मला वाटतं आता सर्व काही संपले आहे. आणि हे चांगले आहे. मला श्वास घ्यायचा आहे आणि आता स्वत:साठी जगायचं आहे.'

माझ्या निर्णयाचा त्याने आदर करावा

'औपचारिकपणे घोषित करते की, आमंच ब्रेकअप झाले आहे. आता मला माझे जीवन माझ्या पद्धतीने जगण्यासाठी वेळ देण्याची गरज असल्याचे मला वाटत आहे. रिलेशनशीपमधून बाहेर पडणे हे माझ्यासाठी योग्यतेचे वाटत आहे. त्याच्यासोबत घालवलेले सर्वक्षण आनंदात गेले. तो चांगला मुलगा आहे. तो नेहमीच माझा चांगला मित्र राहिल. माझ्या निर्णयाचा त्याने आदर करावा.' असं तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.

ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांना धक्का बसला. यात एका युजर्सने 'काही गैरसमज असतील तर, दूर करा' असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने 'गेल्या ४ वर्षाचे नाते असे कसे संपले?' अशा प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, दिव्या आणि वरुणने नुकतेच नवीन घर घेतले होते. घराचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. 'ऐस ऑफ स्पेस' या शोमध्ये वरुण आणि दिव्या एकत्रित दिसले होते. त्यानंतर दोघेजण एकमेंकाना डेट करत असल्याची माहिती समोर आली होती.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news