नाशिक : विहिरीत तोल जाऊन पडल्याने महिलेचा मृत्यू | पुढारी

नाशिक : विहिरीत तोल जाऊन पडल्याने महिलेचा मृत्यू

नाशिक (नांदगाव) पुढारी वृत्तसेवा :
वृध्द आजीला भेटण्यास माहेरी आलेल्या सोनाली व्हडगर (वय २२) रा. जामदरी हिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील कासारी गावात घडली आहे.

दोन महिन्यापूर्वीच सोनालीचा विवाह झाल्याने ती सासरी जामदरी येथे राहत होती. आजीची आठवण आल्याने ती माहेरी (कासारी) आली. आजी सोबत शेतातील विहीरीवर पाणी घेण्यास गेली असता तिचा तोल जाऊन ती विहीरीत पडली. खोलवर पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. घटनेचा अधिक तपास स.प. नो वाघमारे करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button