नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
भविष्यातील निर्गुंतवणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी काही घोषणा करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा तरतुदींसंदर्भात मंगळवारी मोदी वेबिनार घेणार आहेत.
पायाभूत सुविधा उद्योगात कार्यरत असलेले अनेक मान्यवर, १६ प्रमुख मंत्रालयांचे अधिकारी, कॅपसीटी बिल्डिंग कॉर्पोरेशनचे सदस्य, आरबीआय, सेबी, नाबार्डचे अधिकारी, उद्योग-व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, गुंतवणूकदार, नीती आयोगाचे उच्चपदस्थ तसेच राज्य सरकारांचे प्रतिनिधी या वेबिनारमध्ये सामील होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
निर्गुंतवणुकीसंदर्भात बुधवारी होणाऱ्या वेबिनारमध्ये खाजगीकरण, ऍसेट मोनेटायझेशन तसेच भविष्यातील निर्गुंतवणूक योजनांवर चर्चा होणार आहे. यावेळी मोदी यांच्याकडून काही घोषणा होण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडीओ :