रायगड : महाडचे विद्यार्थी युक्रेनमधून सुखरूप परतले !

रायगड : महाडचे विद्यार्थी युक्रेनमधून सुखरूप परतले !

महाड (जि-रायगड), पुढारी वृत्तसेवा:
युध्दग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेले महाडमधील तीन विद्यार्थी आज(दि.७) महाडमध्ये आपल्या घरी सुखरुप पोहोचले. मुग्धा मोरे, खुर्रम बिरादार, शोएब पठाण अशी त्‍यांची नावे आहेत. तिघेही सुखरप परतल्‍याने पालकांच्‍या चेहेर्‍यावरुन आनंद ओसांडून वाहत होता.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे यांची कन्या मुग्धा ही युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह येथे, बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एजाज बिरादार यांचा मुलगा खुर्रम आणि भाचा शोएब पठाण हे दोघे युक्रेनमधील लीव्‍ह या शहरात वैद्यकीय शिक्षण घेत होते. युद्ध सुरु झाल्यानंतर मुग्धा ही कीव्ह येथेच अडकून पडली होती. तर खुर्रम आणि शोएब या दोघांनी मजल दरमजल करित रुमानिया हा देश गाठला होता. काल (दि.६) त्यांना विशेष विमानाने भारतात आणण्यात आले. आज (रविवारी) पहाटे हे तिघेही मुंबई विमान तळावर उतरले आणि तेथून आपल्या पालकांसमवेत महाडला परतले. त्यावेळेस त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहेऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.

महाडचे आमदार भरत गोगावले यांनी या विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांचे स्वागत केले , त्याचप्रमाणे त्यांची विचारपूस केली. आमची मुले घरी सुखरूप परतल्याचे आम्हाला समाधान आहे, पण जेव्हा युक्रेनमध्ये अडकलेले सर्व विद्यार्थी आणि भारतीय परत येतील तेव्हाच, आम्हाला खरा आनंद होईल, अशा शब्दांत खुर्रमच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news