Sa Re Ga Ma Pa : 'सारेगमप'ची विजेती ठरली निलांजना राय | पुढारी

Sa Re Ga Ma Pa : 'सारेगमप'ची विजेती ठरली निलांजना राय

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप’ ( Sa Re Ga Ma Pa ) शोचा ग्रँड फिनाले पार पडला असून शोला विजेती मिळाली आहे. पश्चिम बंगालची निलांजना राय (Neelanjana Ray, वय १९ वर्ष) ‘सारेगमप’ च्या यंदाच्या पर्वाची विजेती ठरली आहे. तिला एक ट्रॉफी आणि रोख १० लाख बक्षीसाने सन्मानित करण्यात आले आहे.

सारेगमपा ( Sa Re Ga Ma Pa ) या लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शोचा यंदाचा पर्वाचा प्रवास संपला आहे. शोच्या सीझनच्या विजेत्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे. महाअंतिम फेरीत पश्चिम बंगालच्या निलांजना हिला सर्वाधिक मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहे. निलांजना हिला ट्रॉफी आणि रोख १० लाख बक्षिसाने सन्मानित करण्यात आले आहे.

सारेगमप’ रिअॅलिटी शोमध्ये निलांजना राय, शरद शर्मा, राजश्री बाग, अनन्या चक्रवर्ती, स्निग्धाजित भौमिक, आणि संजना भट्ट हे अंतिम फेरीत पोहोचणारे टॉप सहा स्पर्धक होते. यातूनच निलांजना रायची निवड करण्यात आली. शोमध्ये राजश्री बाग फर्स्ट रनरअप तर शरद शर्मा सेकंड रनर अप ठरला. राजश्रीला ५ लाख रुपये आणि ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. तर शरद शर्माला ट्रॉफीसह ३ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. निलांजनाने या शोदरम्यान चाहत्यांची मने जिंकली आहेत.

निलांजना पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार या छोट्याशा शहरातील आहे. ती 12 वीत शिकत असून तिला गाण्याची प्रचंड आवड आहे. हा शो जवळपास ३ महिने पडद्यावर चाहत्याचे मनोरंजन करत होता.

निलांजना सारेगामापाची विजेती झाल्यानंतर म्हणाली की, ‘सारेगमप २०२१ जिंकून मला खूप आनंद झाला आहे आणि माझ्या या प्रवासात मला चाहत्यांकडून मिळालेल्या कौतुक आणि प्रेमाबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. हा माझ्यासाठी असा क्षण आहे जो मी कधीही विसरणार नाही. मला अजूनही विश्वास बसत नाही की, हा अद्भुत प्रवास संपला आहे.’

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELANJANA RAY (@neelanjanaray)

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELANJANA RAY (@neelanjanaray)

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELANJANA RAY (@neelanjanaray)

 

View this post on Instagram

 

A post shared by NEELANJANA RAY (@neelanjanaray)

Back to top button