पुढारी ऑनलाईन डेस्क
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पाचं वेड अजूनही प्रेक्षकांना आहे. पुष्पा चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनच्या शानदार अभिनयाने सगळीकडे त्याची वाहव्वा होत आहे. परंतु, चित्रपटाच्या शेवटी १५ मिनिटांमध्ये एका आयपीएस अधिकारी भंवर सिंह शेखावत याच्या धमाकेदार एन्ट्रीने पूर्ण कहाणीचं बदलली. पुष्पा या चित्रपटाचा आयपीएस अधिकारी आहे भंवर सिंह शेखावत. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, अखेर हा दमदार, तगडा अभिनेता रिअल लाईफमध्ये कोण आहे?
केवळ १५ मिनिटांमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याविषयी जाणून घेण्यासाठी वाचक उत्सुक आहेत. खरंतर, चित्रपट पुष्पामध्ये आयपीएस अधिकारी शेखावतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे अभिनेता फहाद फासिल. फहाद फासिलने मल्ल्याळम आणि तमिळमधील अनेक चित्रपटांमध्ये अनेक दमदार अभिनय करून आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.
फहादने आपल्या चित्रपट करिअची सुरुवात २००२ मध्ये 'कायेथुम दुराथ' चित्रपटातून केली होती. पण, हा चित्रपट दुर्दैवाने फ्लॉप ठरला. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने आपला अभिनय सोडून शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. फहाद अमेरिकेला गेला. तेथे त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. याचदरम्यान, पुन्हा एकदा त्याने अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, फहादने 'यूं होता तो क्या होता' चित्रपट पाहिला. या चित्रपटामध्ये अभिनयाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता इरफान खानचा अभिनय त्याला फार आवडला. तो अभिनेता इरफान खानचा फॅन झाला. फहादने इरफानचे एकानंतर एक त्याने अनेक चित्रपट पाहिले आणि अभिनयाच्या दुनियेत परत आला. फहादने इंडस्ट्रीत आपल्या शानदार अभिनयाने अनेक हिट चित्रपटात काम केलं.
पुष्पा पार्ट-२ मध्ये फहाद आणि अल्लू अर्जुन म्हणजेच आयपीएस अधिकारी शेखावत-अल्लू अर्जुन यांच्यामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळेल. चित्रपटाच्या पुष्पा पार्ट-२ ची फॅन्स मोठी प्रतीक्षा करत आहेत.