Samantha viral video : सामंथा पुष्पा सिनेमातील गाण्याची प्रॅक्टिस करताना गेली थकून

Samantha viral video : सामंथा पुष्पा सिनेमातील गाण्याची प्रॅक्टिस करताना गेली थकून

Published on

नवी दिल्ली, पुढारी ऑनालईन 

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिने टाॅलिवुडपासून बाॅलिवुडपर्यंत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सामंथाने 'द फॅमिली मॅन-२' या वेब सीरिजमध्ये केलेल्या कामाचं कौतुक सर्वत्र करण्यात आले. नुकताच अल्लू अर्जुनचा आलेला 'पुष्पा' नावाच्या चित्रपटाने चांगलाच गल्ला कमविला आहे. हिंदी व्हर्जननेदखील मोठी कमाई केलेली आहे. या चित्रपटात "ऊ अंटावा ऊ ऊ अंटावा", या गाण्यात सामंथाने डान्स केलेले आहे. तिच्या या डान्सनेदेखील धमाल उडवून दिली आहे. (Samantha viral video)

सध्या सामंथाच्या या गाण्यावरील डान्स प्रॅक्टिसचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. "ऊ अंटावा ऊ ऊ अंटावा", या गाण्यावर ती प्रॅक्टिस करत असताना दिसत आहे. या गाण्याती डान्ससाठी ती जीवतोड मेहनत करत आहे. त्या व्हिडिओमधून सामंथा प्रॅक्टिस करताना किती थकून गेली आहे, हे दिसतं. कोरिओग्राफरने थकेपर्यंत सामंथाकडून रिहर्सल करवून घेतली आहे.

डान्सिंग स्टेप्सला परफेक्ट करण्यासाठी जीवतोड मेहनत करताना सामंथा दिसत आहे. पुष्पा चित्रपटातील "ऊ अंटावा ऊ ऊ अंटावा", या स्पेशल गाण्यावरील प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. सामंथाचे चाहते आता सामंथा कधी एकदा बाॅलिवुडमध्ये डेब्यू करते, याची वाट पाहत आहेत. (Samantha viral video)

अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिने सोशल मीडियावर एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं होतं. तिच्यावर अभिनेता नागा चैतन्यकडून घटस्फोटानंतर उदरनिर्वाह भत्त्यासाठी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून सामंथा सोशल मीडियावर ट्रेंड करत होती. जेव्हापासून तिचा 'पुष्पा' या चित्रपटातील आयटम सॉन्ग 'ऊ अंटावा' रिलीज झालं होतं, तेव्हापासून तिचा हा आयटम सॉन्ग डान्स खूप चर्चेतही होतं.

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news