'पुष्पा' चित्रपट 'या' स्टार्संनी नाकारला हाेता | पुढारी

'पुष्पा' चित्रपट 'या' स्टार्संनी नाकारला हाेता

पुढारी ऑनलाईन : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ रोजी चाहत्याच्या भेटीस आला. काहीच दिवसांत चित्रपटाने  सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, अभिनेता महेश बाबूपासून ते अभिनेत्री दिशा पटानीपर्यंतच्या स्टार्सनी ‘पुष्पा’ चित्रपटात काम करण्‍यास नकार दिला होता. जाणून घेवूया ‘पुष्‍पा’ला नकार देणारे स्टार्स…

महेश बाबू (Mahesh Babu)

एका रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अल्लू अर्जुनच्या आधी दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पा चित्रपटाची स्क्रिप्ट महेश बाबू याला दाखविली होती. परंतु, महेश बाबू  हा मेकओव्हर करून पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारायला तयार नव्हता. त्‍यामुळे त्‍याने ‘पुष्पा’ मुख्‍य भूमिका साकारण्‍यास नकार दिला. ( अल्लू अर्जुन- रश्मिका )

दिशा पटानी (Disha Patani)

पुष्पा चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे . परंतु, या गाण्यासाठी चित्रपट निर्मात्याची पहिली पसंती अभिनेत्री दिशा पटानी होती.  मात्र, अनेक कारणांमुळे तिने ही ऑफर नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu)

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सामंथा रुथ प्रभुला सुरुवातीला श्रीवल्लीची मुख्य भूमिकेची ऑफर करण्यात आली होती. मात्र, अनेक कारणांमुळे चित्रपटातील मुख्य भूमिका साकारण्यास तिने नकार दिला. यानंतर ही भूमिका रश्मिका मंदान्नाला मिळाली. मात्र पुष्‍पामध्‍ये सामंथाने एक आयटम सॉग केले आहे. या गाण्याला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

नोरा फतेही (Nora Fatehi)

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत. यामुळे पुष्पा चित्रपटाच्या निर्मात्यांनी नोरा हिला  ‘ऊ अंटावा’ गाण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र, नोराने या गाण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी केली. त्‍यामुळे तिने या गाण्‍यात चमकण्‍याची संधी गमावली.

विजय सेतुपती (Vijay Sethupathi)

विजय सेतुपती यांना प्रथम फहाद फासिलने साकारलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याच्या भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र, विजयकडे बिझी शेड्युल आणि तारखा नसल्यामुळे ऑफर नाकारली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button