Allu Arjun : अल्लूच्या ‘पुष्पा’ने प्रभासच्या ‘बाहुबली-२’चा विक्रम मोडत केली १०० कोटींची कमाई | पुढारी

Allu Arjun : अल्लूच्या ‘पुष्पा’ने प्रभासच्या ‘बाहुबली-२’चा विक्रम मोडत केली १०० कोटींची कमाई

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अल्लू अर्जुनच्या ( Allu Arjun ) पुष्पा चित्रपटाचे ( Pushpa : The Rise ) नव नवे विक्रम थांबण्याचे नावच घेत नाही अशी अवस्था आहे. चित्रपटाचे कोटीच्या कोटी उड्डाने सुरु असून त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आता पुष्पा च्या हिंदी डबने १०० कोटींचा गल्ला जमविला आहे. त्यामुळे या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये ( 100 Crore Club ) दिमाखात प्रवेश केला आहे. याचबरोबर, अल्लूच्या ‘पुष्पा’ने प्रभास आणि एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली-२ (हिंदी)’ (बाहुबली: द कन्क्लुजन) चित्रपटाला मागे टाकत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

खरंतर चित्रपटाच्या कथेसोबतच अभिनय, संवाद आणि गाणी हे सगळंच हिट ठरलं. साउथ सिनेमाच्या सर्वाधिक पसंतीच्या चित्रपटांच्या यादीत ‘पुष्पा’ अव्वल स्थानावर पोहचला असून सहा आठवड्यात ‘बाहुबली-२ (हिंदी)’ चा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत ६ आठवड्यांत ६ कोटींची कमाई केली आहे. तर प्रभासच्या चित्रपटाने रिलीजच्या ६ आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर केवळ ५.३८ कोटींची कमाई केली होती.

संपूर्ण भारतभर पुष्पा चित्रपटाची क्रेझ अजुनही पाहण्यास मिळत आहे. फिल्म स्टार्स, क्रिकेटर व अन्य क्षेत्रातील खेळातील खेळाडू, इतर क्षेत्रातील सेलिब्रिटी, राजकारणी, समाज माध्यमांवरील फॉलोअर्स म्हणजे समाजातील सर्व घटकावर पुष्पा चित्रपटाने भूरळ घातली आहे. अनेक खेळाडू, सेलिब्रिटी अल्लू अर्जुनची ( Allu Arjun ) स्टाईल कॉपी करताना, त्याचे रील बनताना पाहण्यास मिळत आहेत. या सगळ्यांमुळे हा चित्रपट, याचे संगीत, डॉयलॉग अद्यापही समाज माध्यमांवर ट्रेंड होताना पहायला मिळत आहे.

या सर्वांमुळे अद्यापही अल्लू अर्जुनच्या ( Allu Arjun ) या चित्रपटास चांगली लोकप्रियता मिळताना दिसत आहे. मुळ तेलगु चित्रपटासह तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषेतील या चित्रपट ब्लॅाकब्लास्टर ठरला आहे. तसेच संपूर्ण जगभर या सिनेमाला मोठी प्रसिद्धी मिळत आहे. हा चित्रपट दक्षिण भारतातील चार मुख्य भाषेसहीत हिंदीमध्ये सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघण्यासाठी उपलब्ध आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत ३५० कोटींची कमाई केली आहे. तसेच २०२१ मधील सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. इतकच नाहीत या चित्रपटांच्या गाण्यांना सोशल माध्यमांमध्ये बिलियन्सच्या घरात पाहिले गेले आहेत आणि लाईक्स मिळाले आहेत.

हा चित्रपट कोरोना निर्बंधामध्ये चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला. शिवाय काही दिवसांत तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखिल दाखल झाला. पण, या चित्रपटाची अशी जादू आहे की, लोकांनी हा चित्रपट सिनेमागृहातच पाहणे अधिक पसंद केले. अजूनही प्रेक्षकांची रिघ चित्रपटगृहांवर हा चित्रपट पाहण्यासाठी लागलेली आहे. १७ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. या काळात किंवा या आधी प्रदर्शित झालेल्या बॉलिवूडच्या सिनेमांना इतके यश मिळाले नाही ते पुष्पाने मिळवले आहे. केवळ अक्षय कुमारच्या सूर्यवंशी याने १०० कोटींचा गल्ला मिळवला पण पुढे तो ही चित्रपट कमाईच्या बाबतीती थंडावला. आता पुष्पाच्या हिंदी डबने १०० कोटींच्या पुढे कमाई केली आहे. सर्वत्र पसरलेली ‘पुष्पा’ प्रसिद्धी पहाता आणि काही रेकॉर्ड हा सिनेमा नक्की करु शकेल. दिग्दर्शक सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुनसह अभिनेत्री रश्मिका मंधाना मध्यवर्ती भूमिका आहे.

 

Back to top button