kalpalatha :पुष्पाची आई साकारलेल्‍या कल्‍पलताचे १४ व्या वर्षी झाले होते लग्न

kalpalatha :पुष्पाची आई साकारलेल्‍या कल्‍पलताचे १४ व्या वर्षी झाले होते लग्न
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

Pushpa या चित्रपटात 'श्रीवल्ली' आणि 'सामी-सामी' गाण्याशिवाय या चित्रपटातील डायलॉग 'पुष्पा…पुष्पा राज, मैं झुकेगा नहीं साला…' खूप चर्चेमध्ये आहेत. चित्रपटातील कलाकारांविषयी सांगायचं झालं तर खलनायक ते पुष्पाचा मित्र केशवपर्यंत सर्वांची रिअल लाईफ खूप इंटरेस्टिंग राहिली आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. पुष्पाच्या आईच्या (kalpalatha) कहाणीनेदेखील सर्व प्रेक्षकांना भावूक केलं आहे; पण, तुम्हाला माहिती आहे का, आईची भूमिका कल्पलता (kalpalatha) या अभिनेत्रीने साकारली आहे. विशेष म्हणजे, पुष्पाच्या आईची भूमिका साकारणाऱी कल्पलता अल्लू अर्जुनपेक्षा केवळ ३ वर्षांनी लहान आहे. जाणून घ्या तिच्याविषयी.

चित्रपटाच्या कहाणीवर एक नजर

खूप गरीब कुटुंबातील पुष्पा आपल्या आईसोबत झोपडीत राहून आपलं पोट भरतो. कहाणीमध्ये पुढे जेव्हा पुष्पा फ्लॅशबॅकमध्ये जातो, तेव्हा समजतं की, त्याचे वडील विवाहित असतानादेखील त्याची आई कल्पलताशी अफेअर  होतं. जोपर्यंत त्याचे वडील जिवंत असतात, तोपर्यंत सर्वकाही ठीक चालतं. पण, त्‍यांच्‍या निधन झाल्यानंतर त्यांचामुलगा पुष्पाला आपलं खरं आडनाव लावायला दिले जात नाही. शाळेत देखील जेव्हा कल्पलता पुष्पाचं नाव नोंद करायला जाते, तेव्हादेखील तेथे हेडमास्टर पूर्ण नाव विचारतात, तेव्हादेखील त्याचा भाऊ येऊन पुष्पाला ओरडतो आणि आडनाव लावण्यास विराेध करताे.

इतक्या सर्व गोष्टी सुरू झाल्यानंतर सुरू होते, पुष्पाची 'झुकायचं नाही' ही शपथ. चित्रपटाची कहाणी जसजशी पुढे जाते, तसंतसे दाखवण्यात आलं आहे की, गरिबी आणि लोकांच्या टोमण्यांनी त्याची आई चिंतेत राहते. पण, पुष्पा ढाल बनून नेहमी उभा राहतो. शेवटी ते झोपडपट्टीतून एक मोठ्या घरात राहू लागतात.

कोण आहे पुष्पाची आई साकारणारी कल्पलता?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कल्पलताने ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने १० मालिकांमध्येही काम केलं आहे. चित्रपटामध्ये पुष्पाच्या आईची भूमिका साकारून प्रेक्षकांनाचं नव्हे तर तिने अल्लू अर्जुनलादेखील इम्प्रेस केलं आहे.

केवळ ३ वर्षांनी लहान आहे कल्पलता

अल्लू अर्जुन आणि कल्पलता यांच्यामध्ये केवळ ३ वर्षांचा फरक आहे. अल्लू ३९ वर्षांचा आहे तर कल्पलता ४२ वर्षांची आहे. ३ वर्षांचा फरक असतानाही तिने आईची भूमिका परफेक्ट साकारलीय. कल्पलताला दोन मुली आहेत. दोघीही नोकरी करतात. कल्पलताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिचं वयाच्या १४ व्या वर्षी लग्न झालं होतं.

कल्पलता सोशल मीडियावरदेखील ॲक्टिव्ह आहे. ती आपले फोटो पोस्ट करते. तिला पाहून तुम्हा आश्चर्य वाटेल की, तिवे कशी काय आईची भूमिका इतक्या चांगल्या पध्दतीने साकारली आहे!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news