Soyrik movie : कोल्हापूरच्या विराटचं सोयरीकमधून होतंय कौतुक | पुढारी

Soyrik movie : कोल्हापूरच्या विराटचं सोयरीकमधून होतंय कौतुक

पुढारी ऑनलाईन

अभिनेता विराट मडकेचा सोयरीक (Soyrik movie) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात विराट पोलिस शिपायाच्या भूमिकेत आहे.. तसंच तो या सिनेाचा सूत्रधारही आहे. विराटच्या उत्तम अभिनयानं आणि टायमिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सिनेमात कोणत्याही कलाकाराला नाव नाहीये. त्यात विराटची भूमिका वेगळी उठून दिसते आहे. सेटवर शूटिंगच्या वेळी अनेक वेळा गावक-यांना विराट हा खरा पोलिस वाटल्याचेही किस्से घडले होते. (Soyrik movie)

सिनेमाच्या अनुभवाबद्दल विराट सांगतो, ”माझ्यासाठी या सिनेमाचा अनुभव खास होता, दिग्दर्शक मकरंद माने यांच्या सिनेमाचा मी फॅन आहे. त्यांचे वास्तववादी सिनेमा मनाला भावतात. तसाच सोयरीक हा सिनेमा महत्वाच्या विषयावर थेट भाष्य करणारा आहे, आणि म्हणूनच माझ्याकडे हा सिनेमा आला आणि मी लगेच होकार दिला. मला माझ्या comfort च्या बाहेर काम करायला आवडत आणि सोयरीक मधून वास्तववादी भूमिका कायला मिळाली याचा आनंद आहे.

मकरंद मानेन सोबत काम करताना खूप शिकायला मिळालं. त्याचबरोबर किशोर कदम, छाया कदम, शशांक शेंडे अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही खूप काही देऊन गेला.”असंही विराट सांगतो.

मुळचा कोल्हापूरचा असलेला विराटचा पहिला सिनेमा केसरी होता. भूमिकेतून वेगवेगळे प्रयोग करायची इच्छा विराटची आहे.

Back to top button