रश्मिका मंदाना म्हणते, लग्‍नासाठी मी अजून लहान | पुढारी

रश्मिका मंदाना म्हणते, लग्‍नासाठी मी अजून लहान

पुढारी ऑनलाईन

साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. रश्मिकाच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत अनेकांना माहिती नाही. अभिनेता विजय देवरकोंडासोबत आणि त्याच्या कुटुंबासमवेत तिने यंदा गोव्यात ख्रिसमस साजरा केला होता, तसेच विजयसोबत ती मुंबईत एका रेस्टॉरंटमध्येही दिसली होती. पण, दोघांनीही कधी त्यांच्या नात्याविषयी काहीही माहिती दिलेली नाही. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा मात्र होत राहिल्या आहेत. तथापि, रश्मिकाने आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

एका मुलाखतीत तिने तिचा पार्टनर कसा असावा, तसेच प्रेम, नातेसंबंध याबाबत विचार मांडले आहेत. रश्मिका म्हणाली की, मला वाटते, एकमेकांचा सन्मान राखणे, एकमेकांना वेळ देणे म्हणजे प्रेम. स्वत:ला पार्टनरसोबत सुरक्षित वाटणे म्हणजे प्रेम. हा सर्व भावनांचा खेळ आहे.

लग्‍नाबाबत विचारल्यावर ती म्हणाली, लग्‍नासाठी अजून माझे वय लहान आहे. मी अजून या विषयाबाबत विचारच केलेला नाही. रश्मिका ‘मिशन मजनू’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रादेखील आहे, तसेच ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’ नावाचा सिनेमा करत आहे.

Back to top button