झटका ४ मार्चला सिनेमागृहात, आता सुरुवात गोंधळाची

झटका ४ मार्चला सिनेमागृहात, आता सुरुवात गोंधळाची
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

सध्या कॉमेडी सिनेमांचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षकही नव्या धाटणीच्या सिनेमांना चांगलीच पसंती देत आहे. तुम्हाला कॉमेडी थ्रीलर सिनेमाचा तडका पाहायचा असेल तर ४ मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. एका प्रेमी युगलाच्या लिव्ह इन रिलेशनशिपला मर्डर मिस्ट्रीमुळे लागलेले ग्रहण पाहायचे असेल तर तुम्हाला झटका, आता सुरुवात गोंधळाची हा चित्रपट नक्कीच पाहावा लागेल. झटका हा उत्तेजना स्टुडिओजची निर्मिती आहे.

या चित्रपटात झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'तुला पाहते रे' फेम पूर्णिमा डे आणि नवोदित अभिनेता गौरव उपासानी तुम्हांला पोट धरुन हसवून घाबरवणार आहेत. पहिल्यावहिल्या रोमान्सची स्वप्न रंगवत नवा फ्लॅट भाड्याने घेत ही जोडी आपल्या प्रेमाला बहर देणार तेवढ्यातच एका बंद कपाटात त्यांना एक मृतदेह सापडतो. आणि सुरु होतो पोलिसांचा ससेमिरा. यातून दोघं कशी सुटतात, खूनाची चौकशी अंगावर आल्यावर एकमेकांवर ढकलपंची करताना दोघांमध्ये होणारा विनोद, 'तो' मृतदेह कोणाचा असतो, मृतदेहाचा आणि नायक-नायिकेचा काय संबंध असतो. या सर्व गोष्टींचा उलगडा होत असताना अनेक विनोदी दृश्येही आपल्याला हसवतात.

या चित्रपटाची निर्मिती डॉ. पार्थसारथी, प्रेरणा उपासानी यांनी केली आहे. दिग्दर्शक अजिंक्य उपासानी चित्रपटाचे सिनेमेटोग्राफरही आहेत. यासह गौरव आणि अजिंक्य उपासानी या बंधूनी या चित्रपटाचा स्क्रिनप्लेही लिहिला आहे. या सर्व खुनाच्या झटक्यात खरा खुनी कोण आहे? हे पाहायला ४ मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहाला नक्की भेट द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news