जपानमध्ये सापडली 400 वर्षांपूर्वीची निन्जा शस्त्रे?

जपानमध्ये सापडली 400 वर्षांपूर्वीची निन्जा शस्त्रे?
Published on
Updated on

टोकियो : जपानी कार्टुन व्यक्‍तिरेखांमुळे हल्‍ली लहान मुलांनाही 'निन्जा'ची ओळख झालेली आहे. त्यांचे अफलातून कौशल्य, अनोखी शस्त्रेही लोकांना माहिती आहेत. जपानमधील दोन किल्ल्यांमध्ये पुरातत्त्व संशोधकांना 400 वर्षांपूर्वीची अशीच निन्जा शस्त्रे सापडल्याचे मानले जात आहे. याबाबतचे संशोधन 1960 ते 2010 च्या दरम्यान करण्यात आलेले आहे. इवात्सुकी आणि हाचीओजी अशा दोन किल्ल्यांमध्ये ही शस्त्रे सापडली.

ही शस्त्रे सन 1590 च्या ओदावारा वेढ्याच्या काळातील असावीत असे मानले जाते. हा वेढा सेंगोकू काळातील (1467 ते 1615) आहेत. त्यावेळी जपानमध्ये सत्तेसाठी अनेक लढाया होत होत्या. तत्कालीन तोयोतोमी आणि तोकुगावा वंशाच्या राजांनी होजो वंशाला पराभूत केले होते. या होजो वंशाकडेच जपानचा बहुतांश भाग आणि हे दोन्ही किल्‍ले होते.

अशा काळात निन्जा लोक हेरगिरीचे व अन्य काम करीत असत. या काळातील त्यांची जी शस्त्रे सापडली आहेत त्यामध्ये सपाट दगडाचा समावेश आहे. चांदणीच्या आकाराच्या फेकून मारण्याच्या शस्त्राची ही पूर्वसुरी असावीत. अशा शस्त्रामुळे शत्रूचा पाय तसेच घोडे जखमी होत असत. पुरातत्त्व संशोधकांनी शोधलेली ही शस्त्रे वेढ्यावेळी घाईगडबडीने बनवलेली असावीत असे संशोधकांना वाटते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news