प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी काळाच्या पडद्याआड | पुढारी

प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी काळाच्या पडद्याआड

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रतिष्ठित बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांचं कोलकाता येथे एका रुग्णालयात निधन झालं. संध्या मुखर्जी यांना गंभीर आरोग्याच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

२७ जानेवारीला संध्या यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वासोच्छवासाच्या तक्रारीनंतर कोलकाता ट्रॅफिक पोलिसद्वारा ग्रीन कॉरिडोराच्य़ा माध्यमातून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दक्षिण कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, बाथरूममध्ये पडल्यानंतर गायिका संध्या यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होतं. बाथरूममध्ये पडल्यानंतर त्यांना तापदेखील होता.

‘बंगा विभूषण’ ने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायिका म्हणून त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला होता. नुकताच संध्या यांनी पद्मश्री पुरस्काराच्या प्रस्तावासाठी नकार दिला होता. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी सहमतीसाठी टेलिफोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला होता.

गायिका संध्या यांनी हा सन्मान घेण्यास नकार दिला होता. एका शास्त्रीय, अर्ध-शास्त्रीय गायिका मुखर्जी यांनी अनेक बंगाली चित्रपट आणि हिंदी चित्रपटांना आपला सुरेल आवाज दिला होता. त्यांनी एसडी बर्मन, मदन मोहन, नौशाद, अनिल विश्वास आणि सलिल चौधरीसहि प्रमुख संगीत दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे.

Back to top button