रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या अफेअरची चर्चा; म्हणाली, त्याची भीती वाटायची | पुढारी

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या अफेअरची चर्चा; म्हणाली, त्याची भीती वाटायची

पुढारी ऑनलाईन

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी एकत्र दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या चित्रपटांचा समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशीपची चर्चा रंगलीय.

‘पुष्पा: द राईज’च्या यशानंतर साऊथची हाएस्ट पेड अभिनेत्रींपैकी एक रश्मिका ठरलीय. साऊथ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख बनवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतलीय. अल्लू अर्जुन-रश्मिका मंदाना स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीय. सध्या रश्मिका ‘लायगर’ स्टार विजय देवरकोंडासोबत रिलेशन असल्याची खूप चर्चा रंगली आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिकाला अनेकदा एकत्र स्पॉटदेखील करण्यात आले आहे. दोघांनीही कधीही आपल्या रिलेशनशीपविषयी कुठलीही माहिती सार्वजनिक केलेली नाही. सध्या या दोघांबद्दल अफेअरची चर्चा सुरू आहे. एकमेकांना डेट करत असलेल्या या दोन्ही स्टार्सना मुंबईमध्ये डिनर डेट आणि गोवा ट्रिपला देखील पाहण्यात आले होते. असो. तुम्हाला माहितीये का, रश्मिकाने एकदा खुलासा केला होता की, तिला विजय देवरकोंडाची भीती का वाटते?

रश्मिका-विजय देवरकोंडाच्या केमिस्ट्रीचे लाखो लोक दीवाने आहेत. चित्रपट गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेडमध्ये रश्मिका-विजय देवरकोंडाच्या जोडीने धुमाकूळ घातला होता. पण, एक वेळ अशीही होती की, तिला विजयची भीती होती. एकदा ‘डियर कॉम्रेड’च्या प्रमोशनवेळी रश्मिकाने सांगितलं होतं की. जेव्हा ती विजयला भेटली तेव्हा तिला नंतर समजलं की, तो खूप ‘चिल फेलो’ आहे.

रश्मिका म्हणाली की, ती ज्या लोकांना पहिल्यांदा भेटते, त्यांची तिला भीती वाटते. ‘गीता गोविंदम’च्या शूटिंगवेळी ती पहिल्यांदा विजयला भेटली होती. पण, दुसऱ्यांदा चित्रपट ‘डियर कॉम्रेड’पर्यंत तिने विजयला ओळखले. विजयसोबत काम करणं सहज सोपे आहे. दुसरा चित्रपट डियर कॉम्रेडचे शूटिंग करणं सोपं होतं. कारण, तोपर्यंत विजयची आणि माझी चांगली ओळख झाली होती.

‘आमच्या भूमिका एकमेकांशी मॅच होतात. आणि आमच्या मैत्रीतील सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, मला विजयला समजण्यासाठी फार मेहनत करावी लागली नाही, असेही तिने म्‍हटलं हाेतं.  चित्रपट ‘डियर कॉम्रेड’मधून रश्मिकाला खूप लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटामध्ये रश्मिका-विजय देवरकोंडाची खूप चांगली केमिस्ट्री स्क्रीनवर पाहायला मिळाली होती. आता रश्मिका ही अमिताभ बच्चन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत बॉलीवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचलं का?

Back to top button