यो यो हनी सिंग चे नागपूर पोलिसांनी घेतले व्हॉईस सॅम्पल | पुढारी

यो यो हनी सिंग चे नागपूर पोलिसांनी घेतले व्हॉईस सॅम्पल

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : रॅप गायक यो यो हनी सिंग यांनी युट्युबर अश्लील व्हिडिओ २०१४ मध्ये अपलोड केले होते. त्या प्रकरणात २०१५ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणासंदर्भात रविवारी आवाजाचे सॅम्पल देण्यासाठी यो यो हनिसिंग हे नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन येथे दाखल आला होता. त्यांची सुमारे चार तास चाललेल्या प्रक्रियेमध्ये सॅम्पल घेण्यात आले.

एसीबीचे व्हाईस तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत हे सॅम्पल घेण्यात आले. यामध्ये आज हनी सिंगचे तीन व्हॉइस सॅम्पल घेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून युट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडिओ गाण्याचे स्क्रिप्ट दिले आणि पंचासमोर गाणे गाऊन व्हाईस सॅम्पल घेण्यात आले.

२०१५ मध्ये दाखल झाला गुन्हा

युट्युबवर अश्लील गाणे अपलोड केल्याप्रकरणी २०१५ मध्ये पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर न्यायालयाने व्हाईस सॅम्पल देण्यासाठी त्यांना नोटीस बजावली होती. यासाठी रविवारी यो यो हनी सिंग यांचे वकील हे पाचपावली पोलीस स्टेशन येथे दाखल झाले होते.

यामध्ये अश्लीलता पसरवणे या आयटी एक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यो यो हनी सिंग रविवारी व्हाईस सॅम्पल देणार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हनी सिंग कोतवाली पोलीस स्टेशन येथे  दाखल झाले. सुमारे ४ तास चाललेल्या प्रक्रियेमध्ये कोतवाली पोलिसांनी हानीसिंग यांच्याकडून ३ सॅम्पल घेतले.

Back to top button